खास छोट्यांसाठी लोककलांवर आधारित नाटुकली, पोवाडा, भारूड आणि बरंच काही
पुणे आणि मुंबईतल्या प्रयोगाला चिमुकल्यांनी दिलेल्या भरघोस प्रतिसादानंतर चिकूपिकू घेऊन येत आहे पिंपरी चिंचवडमध्ये पहिल्यांदाच खास लहान मुलांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी लोककलेवर आधारित मनोरंजक कार्यक्रम - होय महाराजा !
इंटरनेट आणि मोबाईल च्या काळात हरवत चाललेल्या लोककलेची मुलांना ओळख व्हावी आणि महाराष्ट्राची संस्कृती आणि समृद्ध परंपरा पुढच्या पिढीपर्यंत पोहचावी हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. चिकूपिकू च्या खास दिवाळी अंकातील गाऱ्हाणं, गवळण, बतावणी, भारूड, पोवाडा या लोककलांचे रंगमंचावर थेट सादरीकरण बघायला मिळणार आहे. लोककलेतली गाणी, नाट्य, वाद्य, संगीत यांचा प्रत्यक्ष अनुभव घेता येईल आणि मस्तपैकी त्यावर ठेका धरता येईल. तेव्हा लोककलेचा हा उत्सव बघायला आणि आपल्या संस्कृतीला उजाळा द्यायला नक्की या.
वयोगट: 3+
तारीख: 11 जानेवारी 2026
वेळ: संध्याकाळी 6 ते 7
स्थळ: ग.दि. माडगूळकर लघु नाट्यगृह, निगडी
तिकीट: 250/- प्रत्येकी
475/- 1 मुल+1 पालक
तिकिटासाठी संपर्क: 9307874027
Availability : In StockIn StockOut of stockCategories:
Products