चिकूपिकू जानेवारी अंकाची थीम अंतराळ म्हणजेच 'स्पेस' हे आहे . या अंकातल्या गोष्टींमधून सूर्य, चंद्र, ग्रह-तारे आणि आकाशातल्या इतर गमतीजमतींविषयी वाचता येईल. आपल्याला सहज बघता न येणाऱ्या आकाशापलीकडच्या जगातील तारे, धूमकेतू यांविषयी मुलांना कळेल, ग्रहण म्हणजे नेमके काय? ते कसे होते? याविषयी समजेल.
नवीन वर्षातला हा चिकूपिकूचा पहिला अंक. या महिन्यातील थीम आहे अंतराळ म्हणजेच ‘स्पेस’. मुलांना आकाशात दिसणारा चांदोबा, लुकलुकणाऱ्या चांदण्या, कधीतरी दिसणारं विमान याशिवाय रॉकेट, ॲस्ट्रोनॉट या सगळ्या गोष्टींबद्दल खूप कुतूहल असतं. या आकाशातल्या जगाविषयी बरेच प्रश्न पडत असतात. या अंकातल्या गोष्टींमधून सूर्य, चंद्र, ग्रह-तारे आणि आकाशातल्या इतर गमतीजमतींविषयी वाचता येईल. आपल्याला सहज बघता न येणाऱ्या आकाशापलीकडच्या जगातील तारे, धूमकेतू यांविषयी मुलांना कळेल, ग्रहण म्हणजे नेमके काय? ते कसे होते? याविषयी समजेल. छान छान गाणी म्हणून पाहता येतील, यातल्या ॲक्टिव्हिटीद्वारे चंद्राच्या कला समजून घेता येणारं मॉडेल तयार करता येईल. आपल्याला खिडकीतून किंवा गच्चीतून दिसणाऱ्या या छोट्याश्या आकाशाच्या तुकड्यापलीकडेही खूप विशाल जग आहे त्याबद्दल मुलांना सांगता येईल.
या अंकातल्या गोष्टी वाचत पुन्हा एकदा आकाशाचे निरीक्षण करू या, माहिती मिळवू या. मुलांसह आपणही आपलं क्षितिज थोडं वाढवू या!
Age Group |
1+ |
---|---|
Language |
Marathi & English |
ISSN |
RNI TC No. MAHBIL10083 |
No. of Pages |
40 |
Binding |
Paperback |