आपण मोठी माणसं खूप कमी वेळा आश्चर्यचकित होतो. कारण प्रत्येक गोष्टीमागचं लॉजिक आपल्या डोक्यात पक्कं असतं. मुलांचं तसं नसतं, त्यांना अनेक गोष्टी आश्चर्यकारक वाटतात. ‘तुला एक गंमत दाखवू?’ असं म्हटलं की त्यांचे डोळे चमकतात. छोटासा किडा, रंगीत कागद, कोडं, छानसं चित्र, ढगांचे आकार अश्या छोट्या-छोटया गोष्टींची गंमत त्यांना वाटते. चिकूपिकूच्या या जून अंकातून ही मजा पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. अंकात काय वाचाल ? १. सिंहाला झाली सर्दी २. Science सैर ३. म्हण म्हण म्हणी ४. डिटेक्टिव्ह नीना ऍक्टिव्हिटी
अंकात वेगवेगळ्या शैलीतली चित्रं आहेत. मुलांशी चित्रांविषयी गप्पा मारता येतील. एकत्र मिळून नवीन गोष्टी, गाणी तयार करता येतील.
Age Group |
1+ |
---|---|
Language |
Marathi & English |
ISSN |
RNI TC No. MAHBIL10083 |
No. of Pages |
40 |
Binding |
Paperback |