घर म्हणजे काय? तुमची, आमची, आपल्या चिमुकल्यांची हक्काची जागा !! जिथे मुलांच्या बालपणीच्या आठवणी तयार होतात. जशी माणसांची घरं असतात तशीच प्राणी, पक्षी अगदी निर्जीव वस्तूंची सुद्दा घरं असतात नाही का !! त्यांची सुद्धा हक्काची घरातली एक जागा असते.
आणि म्हणूनच या वेळी ‘चिकूपिकू’ घेऊन आलंय एक हळवं, आपलंसं आणि सगळ्यांच्या मनाच्या कोपऱ्यात लपलेलं "आपलं घर"
या खास ‘घर’ अंकात भेटतील वेगवेगळी घरं – प्राण्यांची घरं, पक्ष्यांची घरं, खेळातली घरं, काही खास व्यक्तींची खास घरं – आणि त्यांच्याशी जोडलेल्या गमतीशीर गोष्टी, सुंदर चित्रं.
मग येताय ना चिकूपिकूसोबत सगळ्यांच्या घरात डोकवायला !!