अनेक विषय मुलांशी बोलणं आपण टाळतो. एखाद्या व्यक्तीचं/प्राण्याचं अचानक जाणं… एकटेपणा, भीती यातून मुलांना पडणारे प्रश्न यातून मार्ग काढणं…. मुलांसाठी आणि मोठ्यांसाठी अशा वेगळ्या गोष्टींचं दार उघडणारं पुस्तक !
माऊ गेल्यावर मनूला खूप प्रश्न पडले
माऊ कुठे गेला? पण तोच का गेला?
माऊशिवाय आपण कसं राहायचं?
पण तो कधीतरी तर परत येईल ना?
कधी मनू खूप रडली, कधी ‘नाही-नको’ च्या सूचनांना घाबरली.
कुटुंबाच्या पलीकडची वेगळी कुटुंबं तिनं पाहिली.
आपले जिवलग आपल्यापासून दूर गेल्यानंतर त्या दुःखातून कसं सावरायचं आणि आपला आनंद कसा शोधायचा हे मनू हळूहळू शिकली.
अनेक विषय मुलांशी बोलणं आपण टाळतो. एखाद्या व्यक्तीचं/प्राण्याचं अचानक जाणं… एकटेपणा, भीती यातून मार्ग काढणं … मुलांसाठी आणि मोठ्यांसाठी अशा वेगळ्या गोष्टींचं दार उघडणारं पुस्तक !