दिवाळीच्या निमित्ताने अंधाराची भीती घालवून एक वेगळी ओळख मुलांना करून देऊ या. अंधारातले प्राणी, अंधार-प्रकाश यांचं नातं, सावल्यांचे खेळ, शिवाजी महाराजांची अंधारातली मोहीम, अंधारात चमकणारे जीव अशा भरपूर गोष्टी अंकात आहेत. याशिवाय यात काय काय आहे माहितीये ? इतर मजेदार गोष्टी आणि किस्से, प्रत्येक पानावर सुंदर रंगीत चित्रं, भरपूर ॲक्टिव्हिटीज, कोडी, कविता, हातांनी करून बघण्याची खेळणी, चित्रकला, कोलाजकाम, मातीकाम, रेसिपी, ऑडिओ स्टोरीज .. यादी न संपणारी आहे! मुलांना चॉकलेट्स, खेळणी आपण नेहमीच घेऊन देतो, दिवाळी विशेषांकाची ही भेट आपल्या मुलांबरोबरच त्यांच्या मित्रांना, बहीण-भावांना आवर्जून देऊ या. अंकात काय वाचाल आणि कराल ? १. शाहिस्तेखानाची फजिती २. जादूची सावली ३. चांदोबाची मिशी ५. हातांची जादू