आताच्या डिजिटल काळात पॅरेंटिंग करणारी आपली पहिलीच पिढी आहे. त्यामुळे आपल्यासमोर येणारे प्रश्न, पुढे येऊ शकणाऱ्या समस्या ह्या सगळ्याच गोष्टी नवीन आणि गोंधळात टाकणाऱ्या वाटू शकतात. सगळ्यांच्याच हातात मोबाईल आणि डोळ्यासमोर स्क्रीन असताना त्याचा वापर सुरक्षितपणे कसा करायचा? मुलांसाठी काय धोके असू शकतात. त्यांना त्यापासून दूर कसं ठेवायचं? सायबर पॅरेंटिंगबद्दल मार्गदर्शन करणारं आघाडीचं नाव म्हणजे मुक्ता चैतन्य. त्यांच्याकडून या विषयाची ओळख करून घेऊ या.