नमस्कार पालक!
आपल्यापैकी जवळजवळ प्रत्येक घरात असं घडतं की, स्वयंपाक सुरू असतो, ऑफिसचा कॉल चालू असतो किंवा आपल्याला फक्त पाच मिनिटं शांत बसायचं असतं. अशा वेळी मुलांना शांत बसवण्यासाठी त्यांच्या हातात फोन देणं हा सगळ्यात सोपा उपाय वाटतो.
पण कधी विचार केलाय का, स्क्रीन टाईमचा लहान मुलांच्या मेंदूच्या विकासावर नेमका काय परिणाम होतो?
फोन काढून घेतल्यावर तुमचं मूल खूप रडतं, रागावतं किंवा tantrum करतं? मग तुम्ही एकटे नाही आहात. 5 वर्षांखालील मुलांमध्ये screen time चे दुष्परिणाम हा आजच्या पालकांसमोरचा एक मोठा प्रश्न आहे.
मार्च 2026 मध्ये UK मध्ये जाहीर झालेल्या नवीन संशोधनातून आणि guidelines मधून काही महत्त्वाच्या गोष्टी समोर आल्या आहेत. Fast-paced cartoon videos चा लहान मुलांच्या मेंदूवर काय परिणाम होतो याविषयीचे ते मुद्दे अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया.
आजकालचे videos खूप फास्ट असतात. त्यातली दृश्यं पटकन बदलतात, सतत हालचाल असते आणि खूप आवाजही असतो. संशोधनातून असे दिसून आले आहे की लहान मुलांचा (toddlers) मेंदू एखादी गोष्ट समजून घेण्यासाठी मोठ्यांच्या मेंदूपेक्षा जवळपास 10 पट जास्त वेळ घेतो. म्हणून एवढ्या वेगाने येणारी माहिती त्यांना प्रोसेस करता येत नाही. असे फास्ट व्हिडीओ पाहताना मुलांचं शरीर गोंधळून जातं. संशोधकांना आढळलं आहे की असे व्हिडिओ पाहताना मुलं "fight or flight" (लढा किंवा पळा) stress mode मध्ये जातात. मूल सोफ्यावर शांत बसलेलं दिसत असलं, तरी त्याचं हृदय जास्त वेगाने धडधडू लागतं, स्नायूंमध्ये अचानक ऊर्जा निर्माण होते आणि शरीर एखाद्या धोक्याला तोंड देण्यासाठी तयार होतं. म्हणजे प्रत्यक्षात धोका नसतानाही शरीराला तसा भास होतो.
अनेकदा मूल रडत असेल किंवा रागावलं असेल, तर त्याला शांत करण्यासाठी आपण त्याच्या हातात फोन देतो. पण संशोधन सांगतं की tantrum थांबवण्यासाठी स्क्रीन वापरल्यास, पुढे जाऊन ही समस्या आणखी वाढू शकते.
लहानपणी मुलं जितका जास्त TV किंवा स्क्रीन पाहतात, तेवढं मोठं झाल्यावर त्यांच्या वागणुकीवर नियंत्रण ठेवणं त्यांना कठीण जाऊ शकतं. स्क्रीन टाईम नंतर मुलाचं चिडचिड करणं किंवा रागावणं हा त्या overstimulation चाच परिणाम असतो. आणि जवळजवळ प्रत्येक पालकाने हे अनुभवलेलं असेलच की सगळ्यात मोठा tantrum बहुतेक वेळा स्क्रीन किंवा फोन काढून घेतल्याच्या क्षणीच होतो!
या संशोधनाच्या आधारे लहान मुलांसाठी नवीन screen time guidelines जाहीर करण्यात आल्या आहेत.
टीप: UK सरकारच्या अधिकृत guidelines नुसार 2 वर्षांखालील मुलांना screen time देऊ नये. मात्र या पोस्टसाठी ChikuPiku च्या दृष्टिकोनानुसार, 3 वर्षे वयोगटासाठीही हेच तत्त्व लागू करण्याची आम्ही शिफारस करतो.
नवीन Guidelines
1 ते 3 वर्षे
-
मुलांना एकट्याने स्क्रीन टाईम अजिबात देऊ नका.
-
फक्त video call सारख्या एकत्र करण्याच्या गोष्टी याला अपवाद आहेत. उदाहरणार्थ आजी-आजोबा किंवा नातेवाईकांशी video call.
3 ते 5 वर्षे
-
दिवसाला जास्तीत जास्त 1 तास स्क्रीन टाईम ठेवा.
जेवताना फोन नको
-
जेवताना स्क्रीन्स पूर्णपणे टाळा.
-
तसेच झोपण्याच्या किमान एक तास आधी स्क्रीन बंद करा.
मुलांसोबत पाहा
-
मूल स्क्रीन वापरत असेल तर शक्यतो तुम्हीही त्याच्यासोबत बसा. एकत्र पाहिल्याने त्याचा परिणाम वेगळा असतो.
Slow Content निवडा
-
मुलांच्या वयाला योग्य, शांत गतीचं content निवडा.
-
सतत बदलणारे short videos, social media style reels आणि AI toys पूर्णपणे टाळा.
पण खरं सांगायचं तर स्क्रीन पूर्णपणे बंद करणं प्रत्येक कुटुंबासाठी शक्य नसतं. सकाळची धावपळ, शाळेची तयारी, घरची कामं, ऑफिस ... अशा वेळी थोडा वेळ फोन देण्याचा मोह होणं स्वाभाविक आहे.
तसंच, आजची मुलं AI आणि technology असलेल्या जगात वाढत आहेत. त्यामुळे technology पूर्णपणे बंद करणं हा उपाय नाही, असं अनेक तज्ज्ञांचंही मत आहे.
महत्त्वाचं काय आहे तर technology वर बंदी घालणं नाही, तिचा योग्य वापर शिकणं.
मोकळ्या वेळात किंवा जेवताना फोन देण्याऐवजी मुलांना इतर पर्याय द्या. उदाहरणार्थ—
-
Craft activities
-
हाताने करता येतील असे खेळ
अशा गोष्टी मुलांचं लक्ष गुंतवून ठेवतात आणि त्यांच्या मेंदूला अनावश्यक overstimulation होत नाही.
योग्य screen-free Activities निवडल्यास मुलांमध्ये निरोगी सवयी विकसित होण्यास मदत होते.
या विषयावरचं संशोधन पुढेही सुरू राहणार आहे आणि guidelines वेळोवेळी बदलू शकतात. पण एक गोष्ट मात्र सर्व तज्ज्ञ मान्य करतात - आपल्या मुलासाठी काय योग्य आहे, याचा सर्वोत्तम निर्णय पालकच घेऊ शकतात. आपल्या निरीक्षणावर आणि पालक म्हणून असलेल्या जाणिवेवर विश्वास ठेवा.
तुमच्या मुलाचीही स्क्रीन पाहिल्यानंतर चिडचिड वाढते का?
तुमचा अनुभव आणि screen-free activities चे आवडते पर्याय आम्हाला नक्की सांगा!
