खेळता-खेळता शिकू या आणि शिकता-शिकता खेळू या!
मराठी भाषेची ओळख, बुद्धीला चालना देणारे बोर्ड गेम्स आणि मुलांच्या मेंदूला चालना देणाऱ्या मजेशीर activities — हे सगळं एकत्र असलेला हा खास संच.
१. अक्षरपत्ते :
स्वर आणि व्यंजनांची ओळख करून देणारी,
मराठी अक्षरओळख आणि वाचनासाठी अतिशय उपयुक्त फ्लॅशकार्ड्स.
२. Board games 1
रेल्वे, माझं घर, जंगल सफारी, समुद्र अश्या वेगवेगळ्या थीम्सवर आधारित बोर्ड गेम्स
३. Board games 2
चिकूपिकूच्या पुस्तकांमधील माऊ-बाऊ, ड्रॅगोबा, डायनोबा, फिशिरा ही लाडकी पात्रं,
तसंच अंतराळ सफर आणि शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांची ओळख करून देणारे बोर्ड गेम्स.
४. मज्जा बिज्जा
शब्दकोडी, चित्र रंगवा, ठिपके जोडा, रस्ता शोधा अशा भरपूर activities असलेलं
लहानसं, हलकं आणि कुठेही सहज नेता येईल असं पुस्तक.
मित्रमैत्रिणींबरोबर मुलं खेळू शकतील, प्रवासातही बरोबर घेऊन जाऊ शकतील आणि लहानांबरोबर मोठ्यांनाही हे खेळ खेळताना मजा येईल. छोट्या दोस्तांना भेट म्हणूनही नक्की द्या.