रजिस्ट्रेशन 10 वाजता सुरू होईल. 11 पासून कार्निवल मधले कार्यक्रम आणि वर्कशॉप्स चालू होतील त्यामुळे कृपया वेळेवर पोहोचा.
तिकिटात नाटुकली आणि म्युझिकल असे दोन शो, दोन वर्कशॉप्स, झपूर्झाची एंट्री आणि आर्ट गॅलरी टूर, फन फेअर गेम्स समाविष्ट आहेत.
तिकिटात जेवण समाविष्ट नाही. झपूर्झामध्ये बाहेरील खाद्य पदार्थ आणण्यास मनाई आहे. आम्ही कार्निवलसाठी सवलतीच्या दरात काही जेवणाचे ऑप्शन उपलब्ध करून देत आहोत. तिकीट विकत घेतानाच तुम्ही जेवणाची ऑर्डर बुक करून टाका. त्यामुळे जेवणाची सोय आम्हाला वेळेत करता येईल.
आम्ही दिलेल्या ऑप्शन व्यतिरिक्त इतर पदार्थ तुम्ही झपूर्झामधल्या कॅफेमधून विकत घेऊ शकता.
तिकिटात चहा आणि मुलांसाठी छोटा खाऊ समाविष्ट आहे.
जाण्यायेण्याची व्यवस्था तुम्ही स्वतःच करायची आहे. (Ample parking space available.)