या ऑगस्ट अंकाची थीम आहे ‘सण’.
मराठी महिन्यातील श्रावणात वेगवेगळे सण आपण साजरे करतो. वातावरणातील बदलांनुसार आपले हे सर्व सण निसर्गाशी जोडलेले आहेत. श्रावणातील हे सण साजरे करताना उकडलेली दिंड, नारळीभात, दहीकाला हे पचायला हलके पण चविष्ट पदार्थ आपण खातो. निसर्ग, प्राणी, झाडं, पाऊस, पाणी, मनुष्य या सगळ्यांबद्दल प्रेम, आपुलकी, बंधुता आणि कृतज्ञाता हे सण आपल्याला शिकवत असतात. निसर्ग आपल्याला भरभरून देतो, आपणही या सणांच्या माध्यमातून त्याला काहीतरी देण्याचा प्रयत्न करू या.
प्रत्येक सणामागचा उद्देश स्वतः समजून घेतला तर ते मुलांपर्यंत पोहचवणं अगदी सोपं होईल. चिकूपिकूच्या या अंकातून सणासुदीची ही मजा सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत.
मराठी महिन्यातील श्रावणात वेगवेगळे सण आपण साजरे करतो. आपले हे सण निसर्गाशी जोडलेले आहेत. वातावरणातील बदलांनुसार आपले हे सण साजरे करतो. श्रावणातील सण साजरे करताना उकडलेली दिंड, नारळीभात, दहीकाला हे पचायला हलके पण चविष्ट पदार्थ आपण खातो. निसर्ग, प्राणी, झाडं, पाऊस, पाणी, मनुष्य या सगळ्यांबद्दल प्रेम, आपुलकी, बंधुता, आणि कृतज्ञात सण आपल्याला शिकवतात. निसर्ग आपल्याला भरभरून देतो. सणांच्या माध्यमातून आपणही त्याला काहीतरी देऊ शकतो.
अंकात वेगवेगळ्या शैलीतली चित्रं आहेत. मुलांशी चित्रांविषयी गप्पा मारता येतील. एकत्र मिळून नवीन गोष्टी, गाणी तयार करता येतील.
Age Group |
1+ |
---|---|
Language |
Marathi & English |
ISSN |
RNI TC No. MAHBIL10083 |
No. of Pages |
40 |
Binding |
Paperback |