या अंकाची थीम आहे ‘डुबुक डुबुक बेडूक’. जमिनीखाली समाधी लावून बसलेले बेडूक पावसाची चाहूल लागताच उडी मारून वर येतात. असेच काही बेडूक चिकू पिकूच्या या अंकात दडून बसले आहेत. या बेडकांच्या गमती-जमती, मजेशीर गोष्टी, आणि भरपूर चित्रं मुलांना आणि मोठ्यांना नक्की आवडतील.
हे डराँव -डुरुक बेडूक वातावरणातल्या बदलाप्रमाणे स्वतःमध्ये बदल घडवतात आणि जे काही निसर्ग त्यांना देईल त्याचा मनापासून स्वीकार करतात. भरपूर किडे-कीटक खाऊन कीटकांच्या संख्येवर नियंत्रण ठेवायला मदत करतात. निसर्गाशी असलेली त्यांची मैत्री कित्ती घट्ट आहे ना!
मुलांना आणि आपल्यालाही निसर्गाशी थोडं जोडून घेता येईल का?
अंकात वेगवेगळ्या शैलीतली चित्रं आहेत. मुलांशी चित्रांविषयी गप्पा मारता येतील. एकत्र मिळून नवीन गोष्टी, गाणी तयार करता येतील.
Age Group |
1+ |
---|---|
Language |
Marathi & English |
ISSN |
RNI TC No. MAHBIL10083 |
No. of Pages |
40 |
Binding |
Paperback |