चिकूपिकूचा हा अंक आहे – हसण्यावर. आपण हसतो तेव्हा सगळ्या शरीराला आनंदाची अनुभूती होते. म्हणूनच मुलं आनंद झाला की उड्या मारतात. टाळ्या वाजवतात. नाचतात. घरभर फिरतात.
या अंकात गोष्टी, सोपे विनोद आहेत. ते आपण मुलांना सांगितल्यावर त्यांनी दुसऱ्यांना सांगावेत, हे तुम्ही नक्की त्यांना सांगा. लगेच नाही, पण हळूहळू हे कौशल्य विकसित होईल. दुसऱ्यांना हसवण्यात पण मज्जा असते, त्यात आपल्यालाही गंमत वाटते. हे त्यांना कळेल.
मुलांनीच नाही, तर आपणही आनंदात राहायला पाहिजे. हसायला पाहिजे. असं म्हणतात की लहानपणी मुलं खूप हसतात. मोठेपणी मात्र हसणं कमी होतं. हसणं कमी झालं की शरीरात कुठे कुठे साचलेले आजार डोकं वर काढायला लागतात. म्हणून या अंकातून हा छोटासा हास्ययोग घेऊन येत आहोत. म्हणतात ना Smile is free therapy!
चिकू-पिकू मासिकाच्या अंकांची मांडणी मुलं आणि आई-बाबा यांचा विचार करून केलेली आहे. टीव्ही, मोबाईलचा वापर कमी करून, मुलांना योग्य प्रकारे engage करण हा आमचा मुख्य उद्देश आहे. अंकातील गोष्टी मुलांना मोठ्याने वाचून दाखवूयात. मुलं गोष्टींमध्ये रमतात आणि आई-बाबांशी नव्याने जोडली जातात. मासिकातल्या activities मुलांसोबत आपणही करूयात.
नोट: चिकूपिकू मासिकाच्या वार्षिक वर्गणीमध्ये ( Yearly Subscription) सुट्टी विशेषांक आणि दिवाळी विशेषांक हे मोठे जोड-अंक समाविष्ट केलेले आहेत.
Age Group |
1+ |
---|---|
Language |
Marathi & English |
ISSN |
RNI TC No. MAHBIL10083 |
No. of Pages |
40 |
Binding |
Paperback |