चिकूपिकूचा सुट्टी विशेषांक म्हणजे एप्रिल-मे दोन महिन्यांचा मिळून मोठा जोड-अंक. मुलांना सुट्टीत भरपूर गोष्टी आणि ऍक्टिव्हिटीजचं खाद्य पुरवणारा सुट्टीतला दोस्त म्हणजे चिकूपिकू सुट्टी विशेषांक! या अंकाचा विषयसुद्धा आम्ही खूप खास निवडला आहे. भारत! भारत देश म्हणजे नक्की काय हे क्लिष्टपणे न सांगता उमजेल अशा गोष्टींमधून सांगण्याचा ,भारताची सफर घडवण्याचा, ओळख करून देण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. अंकात काय वाचाल आणि कराल ? १. जय तिलक गोष्ट २. सावल्यांचा खेळ ऍक्टिव्हिटी ३. हिंद देश के निवासी सभी जन एक है कविता ४.शूर तारा ५.चिमणी चित्रं ऍक्टिव्हिटी
शाळेत शिकतील ती माहिती आधीच देणे असा या अंकाचा अजिबात उद्देश नाही. त्यामुळे राजधानी, राज्ये, अर्थव्यवस्था असं काहीच या अंकात नाहीये. भारताचा इतिहास, भूगोल यात नाहीये. पण छोट्या छोट्या गोष्टींमधून आपल्या देशाचा स्वभाव, अंतरंग मात्र नक्की दाखवलेलं आहे. अंकात वेगवेगळ्या भाषा, अन्नपदार्थ, सण साजरे करण्याच्या वेगळ्या पद्धती ..पण तरी त्यात सारखी असलेली मूल्यं, सारखे विचार, प्रेम, कुटुंबाचं महत्त्व हे मुलांच्या मनात नकळत रुजेल अशा गोष्टी आहेत. कविता आणि गाणीसुद्धा आहेत. बैठे, घरच्या घरी खेळता येतील असे खेळ आहेत. याशिवाय स्वतःच्या हातांनी काम करून नवीन काही बनवण्याचा आनंद मुलांना मिळेल अशा ऍक्टिव्हिटीज आहेत. तुम्हीसुद्धा त्यांच्याबरोबर ही हातांची जादू नक्की अनुभवा.
मुलांना चिकूपिकूबरोबर धमाल मजेची सुट्टी देण्याचा प्रयत्न आपण करू या. त्यांच्यासोबत आपणही सुट्टीतली ही मजा पुन्हा अनुभवू या.
Age Group |
1+ |
---|---|
Language |
Marathi & English |
ISSN |
RNI TC No. MAHBIL10083 |
Binding |
Paperback |