मुलांच्या स्क्रीनटाईमविषयी प्रॅक्टिकल टिप्स - काय, कसं दाखवायचं, काय टाळायचं?
आजच्या डिजिटल युगात, स्क्रीन (मोबाईल, टीव्ही, टॅब्लेट) हे मुलांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहेत. त्यांच्यापासून पूर्णपणे दूर राहणं शक्य नसलं तरी, जाणीवपूर्वक आणि जबाबदारीने त्यांचा वापर करणं आणि मुलांनाही ते शिकवणं आपल्या हातात आहे. हे करत असताना Digital Well-being, Digital Diet या संकल्पना समजून घेणे आवश्यक आहे, जेणेकरून आपण जबाबदारीने मुलांना स्क्रीन एक्सपोजर देऊ शकू.
चला तर मग, या संदर्भातील महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांची सोपी उत्तरं समजून घेऊ या!
‘डिजिटल डायट' म्हणजे नक्की काय असतं?
जसं आपण अन्नाचं नियोजन करतो, तसंच स्क्रीनच्या वापराचंही नियोजन असावं. त्यात तीन गोष्टी महत्त्वाच्या:
-
काय बघताय? (Content)
- कशावर बघताय? (Device)
- कधी आणि किती वेळ बघताय? (Time & Duration)
DOs and DON’Ts of Screen Time
How to select Content?
मुलांसाठी कंटेंट निवडताना तो वयाला साजेसा (Age-appropriate) असणं महत्त्वाचं आहे. हिंसा, आक्रमक वर्तन, किंवा शिवीगाळ असलेला कंटेंट टाळावा. कंटेंटचे दोन मुख्य प्रकार आहेत:
DOs :
-
Low Stimulation Content - हा content बघताना मुलांना विचार करायला वेळ मिळतो, संवाद ऐकावे लागतात, रंग भडक नसतात आणि आवाज कर्कश नसतात. शिवाय यामुळे patience वाढतात.
DON’Ts :
-
High Stimulation Content - हा content बघताना मुलांच्या मेंदूला विचार करायला वेळ मिळत नाही, खूप visual noise, पटकन बदलणारी दृष्य, भडक रंग असतात. एकदा याची सवय लागली की शांत गोष्टी बघाव्याशा वाटत नाहीत.
Examples : Paw Patrol, न्यूज चॅनेल्स -
Reels आणि Get Ready With Me (GRWM) प्रकारचे व्हिडिओ मुलांना दाखवणे का टाळावेत?
Reels चा time span कमी असतो, त्यामुळे मुलांचं लक्ष एकाग्र राहत नाही. Reels पाहिल्याने मेंदूत Dopamine नावाचे हार्मोन सतत स्रवते आणि त्यामुळे स्क्रीन चे addiction होऊ शकते. GRWM किंवा गेम खेळताना बघणं - मुलं काहीही शिकत नाहीत, फक्त वेळ वाया जातो.
Device Selection: Choosing the correct device to watch the content with children
DOs :
-
मोठा स्क्रीन (Television) - डोळ्यांसाठी चांगला, सहज अॅक्सेसिबल नसतो, ठराविक वेळेपुरता मर्यादित असतो.
घरातले सगळे जण एकत्र बसून TV बघू शकतात, एखादी छान movie किंवा show निवडून एकत्र पाहू शकता, त्यावर गप्पा मारू शकता. कार्टून व्यतिरिक्त नॅशनल जिओग्राफिक, ट्रॅव्हल शो किंवा फूड रिलेटेड शो सारखे विविध प्रकारचे कंटेंट तुम्ही मुलांसोबत पाहू शकता.
DON’Ts :
-
Avoid Mobile phones - स्क्रीन खूप लहान असल्याने डोळ्यांवर ताण येतो, त्यामुळे नंबर वाढण्याचा धोका असतो.
-
लहान टॅबलेट्स - मोबाईलपेक्षा थोडी मोठी स्क्रीन असली तरी मुलं जवळूनच पाहतात.
Screen time as per age
- ०–२ वर्षे - पूर्णपणे टाळा.
- २.५ वर्षांपासून - ५–१० मिनिटे.
- ४ वर्षांपासून - एक गोष्ट किंवा एपिसोड (२०-३० मिनिटे)
- ७ वर्षांपर्यंत - १ तास मर्यादित.
How to conclude screen time positively? / स्क्रीन टाईम संपल्यावर काय करावं?
DOs :
- सेन्सरी खेळ: माती, ओरिगामी, क्ले, चित्रं काढणं
- कथा-वाचन: गोष्ट वाचा, चित्रं तयार करायला लावा.
- मुलांवर जबाबदारी टाका - रिमोट त्यांच्या हातात द्या आणि टाइमर लावून त्यांना स्वतःहून स्क्रीन बंद करायला सांगा.
- मुलांना काय चांगले आणि काय वाईट हे समजावून सांगा.
- आई-बाबांचा सहवास आणि attention - "चल आपण काहीतरी खेळू या" फक्त एवढा प्रश्न विचारलात ना तरी ती मुलं Screen सोडून येतील. तेवढा वेळ मात्र तुम्ही द्यायला तयार राहा.
DON’Ts :
- अचानक बंद करू नका, मुलं चिडू शकतात
- लगेच अभ्यास नको
-
वेळ संपल्यावर ओरडू नका किंवा शिक्षा टाळा
तज्ज्ञांची कधी मदत घ्यावी?
जर स्क्रीन टाईम हाताबाहेर जात असेल किंवा मुलांमध्ये चिडचिड, अधीरता किंवा व्यसनासारखी लक्षणं दिसू लागली तर डिजिटल वेल-बीइंग कोच किंवा समुपदेशकाशी संपर्क साधायला अजिबात संकोच करू नका. कधीकधी एका छोट्याशा सल्ल्यानेही मोठा फरक पडू शकतो.
स्क्रीनचा वापर टाळता येणार नाहीये, त्याऐवजी त्याचा जबाबदारीने आणि योग्य प्रकारे वापर कसा करायचा हे मुलांना शिकवणे महत्त्वाचे आहे. जागरुकता आणि सक्रिय सहभागाने आपण आपल्या मुलांना निरोगी डिजिटल सवयी लावून देऊ शकतो.
या विषयावरचा चिकूपिकूचा "मुलं स्क्रीन बघतातच, मग नक्की काय दाखवायचं" हा धनश्री भिडे यांच्याशी साधलेल्या संवादाचा व्हिडीओ नक्की पहा. धनश्री भिडे या मानसशास्त्रज्ञ आणि डिजिटल वेलनेस कोच असून, या क्षेत्रात त्या मागील १५ वर्षांपासून कार्यरत आहेत. सध्या त्या पुणे विद्यापीठातून फोकस मॅनेजमेंट आणि डिजिटल डाएट या विषयांवर पी.एच.डी. करत आहेत. त्या पालकांसाठी वैयक्तिक सत्रे (individual sessions) तसेच कार्यशाळा घेतात.
Print + Audio
Only Audio
Only Magazines
Magazines
Our Combo Packs
Books By Quests
Curated
Books
Parenting Courses
Expert Talks
Books on Parenting
Parenting
Blogs