ChikuPikuChikuPikuChikuPiku

पालकांसाठी टिप्स

  • कळत्या वयातली ही मुलं लॉजिकल गोष्टी ऐकतात, नाही पटलं तर वाद घालतात आणि तुमच्या भावनांशी खेळूनसुद्धा पाहू शकतात.
  • चॅलेंजिंग गोष्टी करायला त्यांना आवडायला लागलेलं असतं त्यामुळे स्क्रीन पेक्षा बाहेरच्या ज्या गोष्टींमध्ये डोकं लावायला लागेल, नवीन काहीतरी कळेल, त्या आवडतील.
  • एखादी कला, खेळ, छंद मुलांमध्ये रुजण्याचं हे वय आहे. वेगवेगळ्या गोष्टींचे अनुभव त्यांना मिळतील आणि एखाद्या गोष्टीत जास्त आवड, गती असेल तर त्यात प्रोत्साहन मिळेल असा प्रयत्न करायला हवा.
  • याच वयात मित्र-मैत्रिणी काय करतात, त्यांच्या ग्रुपमध्ये काय चालू आहे याचा प्रभाव खूप जास्त असतो त्यामुळे मित्रांनी एखादा व्हिडीओ पाहिला आहे, एखादा गेम ते खेळतात हे खूप स्ट्रॉंग कारण असू शकतं.

स्क्रीनचा अतिवापर टाळण्यासाठी

  • मुलांच्या रुटीनमध्ये शाळा, अभ्यास, मैदानी खेळ किंवा व्यायाम, फॅमिली टाईम, वाचन-छंद आणि स्क्रीन टाईम या सगळ्याचे संतुलन असेल असाच प्रयत्न करा.
  • घराचे स्क्रीनविषयी नियम ठरवून घायचे आणि ते ठरवताना मुलांना पण त्यात सहभागी करून घ्यायचं. जेवताना फोन बाजूला ठेवायचे असा नियम केला तर तो घरातल्या सगळ्यांनी पाळायचा. 
  • अभ्यासासाठी आणि मनोरंजनासाठी असे दोन प्रकारचे स्क्रीन टाईम असू शकतात त्याविषयी बोलून दोन्हीमधला फरक आणि दोन्हीसाठी लिमिट किती ठरवा. दिवसाचा किंवा आठवड्याचा स्क्रीन टाईम किती असावा हेसुद्धा मुलांशी बोलून ठरवून घ्या. 
  • मुलं वापरणार असतील ते फोन, लॅपटॉप, टॅब यावर पॅरेंटल कंट्रोल सेट करून ठेवा ज्यामुळे चुकीचा/अयोग्य कंटेन्ट मुलांच्या नजरेस पडणार नाही.
  • स्वतःचा स्वतः संयमाने स्क्रीन कसा वापरायचा हे शिकवण्यावर भर असावा.

    काय खेळायचं?

    Image 1

    दगड का माती

    Image 2

    डबडा ऐस पैस

    Image 3

    Chess

    Image 4

    Badminton

    Image 5

    Cycle

    Image 6

    Football/Basketball

    कोणत्या गोष्टी सांगायच्या

    Four Column Layout
    Download Printable Stories

    कोणत्या Activities करायच्या

    Image 1

    सोपे जेवण पदार्थ बनवा 
मुलांनी आणि आपण मिळून जेवणातले काही सोपे पदार्थ करायचे.

    Image 2

    जेवणाची तयारी: जेवणाची तयारी करण्यात एखादी जबाबदारी मुलांना देऊन टाकायची. ताटं मांड, वाट्या-चमचे घे, पाण्याची भांडी ठेव, तू सगळ्यांना बोलावून आण एकत्र बसून जेवायला इत्यादी.

    Image 3

    वैज्ञानिक खेळणी

    Image 4

    पेंटिंग: एखादी थीम घेऊन त्यावर आर्ट प्रोजेक्ट अशा ऍक्टिव्हिटीज घरातल्या घरात होऊ शकतात.

    चांगला स्क्रीनटाईम कोणता असू शकतो?

    • स्क्रीन टाईम होणारच आहे तर तो चांगल्या गोष्टींचा होऊ शकतो.
आपल्या मुलाच्या आवडीनिवडी, इंटरेस्ट बघून त्यासाठी निवडक सिरीज, शॉर्ट फिल्म्स, चित्रपट, डॉक्युमेंटरी शोधून ठेवू शकतो. मुलांबरोबर एकत्र बसून सगळ्यांचा असा चांगला स्क्रीनटाईम पण होऊ शकतो. 
    • नवीन गोष्टी शिकण्यासाठी सुद्धा अनेक अँप्स आहेत. भाषा, म्युझिक, कोडींग, STEM activities, चित्रकला यासाठी स्क्रीन वापरला तर तो वेळ चांगल्या स्क्रीन टाईम मध्ये मोडेल.  
    • काही शैक्षणिक आणि माहितीपर shows - National Geographic, How things work

      Other Resources

      स्क्रीन टाईम कमी करण्यासाठी 12 टिप्स

      By - Pooja Damle

      मुलांना वळण कसं लावायचं ? 

      By - Anuja Kulkarni

      स्क्रीन टाईमचं टाईम टेबल!

      By - Pooja Damle

      इतर वयोगटासाठीचे Solutions

      Go Back to Main Page
      Sunday,Monday,Tuesday,Wednesday,Thursday,Friday,Saturday
      January,February,March,April,May,June,July,August,September,October,November,December
      Not enough items available. Only [max] left.
      Shopping cart

      Your cart is empty.

      Return To Shop

      Add Order Note Edit Order Note
      Estimate Shipping
      Add A Coupon

      Estimate Shipping

      Add A Coupon

      Coupon code will work on checkout page