कोणत्या Activities करायच्या
एकत्र जेवण आणि गप्पा: शक्य असेल तेव्हा घरातले सर्व जण जेवायला एकत्र बसा. दिवसभर कामानिमित्त वेगवेगळे असताना, घरातल्या सगळ्या मंडळींनी काय काय झाले ह्याची देवाणघेवाण करायला एकत्र जेवणे ही उत्तम प्रथा आहे.
मुलांनी आणि आपण मिळून जेवणातले काही सोपे पदार्थ करायचे.
मुलांना घेऊन भाजी आणायला जायचं. एकदा त्यांच्या आवडीची एकदा तुमच्या आवडीची भाजी घ्यायची. निवडणे, धुणे अशा कामात मदत करायला सांगायची.
जेवणाची तयारी करण्यात एखादी जबाबदारी मुलांना देऊन टाकायची. ताटं मांड, वाट्या-चमचे घे, पाण्याची भांडी ठेव, तू सगळ्यांना बोलावून आण एकत्र बसून जेवायला इत्यादी.