चिकूपिकू नक्की काय आहे? छोट्यांसाठी गोष्टी - गाण्यांचा खजिना आणि मोठ्यांसाठी एक पालक-मित्र!
गोविंद-अमृता आणि त्यांची मुलगी मुक्ता यांनी २०१९ मध्ये चिकूपिकूची सुरुवात केली. मुक्ता लहान होती तेव्हा तिला खेळवताना, जेवू घालताना, झोपवताना गोष्टी आणि गाणी सतत बरोबर असायच्या, चित्रं समोर असायची. या सगळ्यामुळे तयार होणारं पोषक वातावरण एकीकडे दिसत होतं आणि मराठीत अगदी लहान मुलांसाठी नव्याने काही गोष्टी-पुस्तकांची फारशी भर पडताना दिसत नव्हती.
यातून त्यांनी ठरवलं १ ते १० मधल्या छोट्या मुलांसाठी मराठी मासिक सुरू करायचं आणि त्याला जोड द्यायची ऑडिओ गोष्टींची. त्याबरोबरीने हळूहळू इतर उपक्रमही जोडले गेले आणि पसारा वाढत गेला. तेव्हापासून अनेक लेखक, चित्रकार, कवी, शिक्षक, बालमानसतज्ज्ञ आणि खूप खूप मुलं आणि त्यांचे पालक चिकूपिकूच्या कुटुंबात सामिल झाले आहेत.