सुपरमॅन, बॅटमॅन, स्पायडरमॅन अशा अनेक सुपर हिरोचं आकर्षण मुलांना असतंच आणि आपल्याकडे तशा सुपर पॉवर्स असाव्यात असंही वाटत असतं आणि ते तशा कल्पनाही रंगवत असतात. कधी मनात सुपरहिरोसारखी धडाकेबाज एन्ट्री करण्याची इच्छा तर कधी पंखांशिवाय हवेत उडण्याची स्वप्नं!
पण सुपर पॉवर म्हणजे असं फार काही जादुई नसून जे आपल्यात आहे किंवा आत्ता जे साधं आहे ते सुपर करण्याची महत्वाकांक्षा हे मुलांना या अंकातून सांगण्याचा प्रयत्न केला आहे आणि म्हणूनच या अंकातल्या भन्नाट सुपर पॉवर्सच्या गोष्टी वाचायला मुलांना खूप मजा येईल. थंगा रबरमॅनची गोष्ट, प्रसिद्ध कवी संदीप खरे यांची सुपरमॅन ही कविता, शिवाजी महाराजांची उंबरखिंडीतली लढाई, भरपूर चित्रं, कोडी आणि ॲक्टिव्हिटीज यांनी अंक भरगच्च सजला आहे.