नदी गं नदी
या महिन्याच्या चिकूपिकूच्या अंकात खळखळ वाहत आपल्याला भेटायला आल्यात 'नद्या'. नदी म्हणजे आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक. ती आहे म्हणून आपण आहोत. अशा या जीवनदायिनी नदीविषयी मुलांच्या आणि आपल्या मनात संवेदनशीलता, प्रेम, आपुलकी वाढावी हा या अंकाचा उद्देश आहे.
या अंकात नदीचा जन्म कसा होतो, पूर्वीची आणि आताची नदी यात फरक पडलाय का, नदीतले आणि तिच्या आसपासचे प्राणी, पक्षी कोणते अशा भरपूर छान छान गोष्टी आहेत, सर्व बाजूंनी मुलांची नदीशी ओळख करून देण्याचा प्रयत्न आहे. नदीची गाणी आहेत, खूप सुंदर चित्रं आहेत, गोष्टी आहेत, नदीतल्या होडीची activity आहे आणि शेवटी एकदम टाळ्या वाजवत म्हणावी अशी नदीची आरतीसुद्धा आहे!