चिकूपिकू मासिकातून प्रत्येक महिन्याला गोष्टी, चित्रं, गाणी, हातांनी करून बघायच्या सोप्या ॲक्टिव्हिटीज मुलांपर्यंत पोहोचतात. त्यानिमित्तानं आई-बाबा आणि मुलं एकत्र क्वालिटी टाईम घालवतात. अंकातल्या सगळ्या गोष्टी आणि गाणी ऑडिओ स्वरूपात वेबसाईटवर दिलेल्या आहेत. अंक हातात धरून ऑडिओ गोष्टी ऐकायला मुलांना आवडतात.चिकूपिकू मासिकातून प्रत्येक महिन्याला गोष्टी, चित्रं, गाणी, हातांनी करून बघायच्या सोप्या ॲक्टिव्हिटीज मुलांपर्यंत पोहोचतात. त्यानिमित्तानं आई-बाबा आणि मुलं एकत्र क्वालिटी टाईम घालवतात. अंकातल्या सगळ्या गोष्टी आणि गाणी ऑडिओ स्वरूपात वेबसाईटवर दिलेल्या आहेत. अंक हातात धरून ऑडिओ गोष्टी ऐकायला मुलांना आवडतात
आपल्या आयुष्यातून संगीत गायब होऊन गेलं तर काय होईल? संगीत आणि वाद्यांचे आवाज गायब झालेल्या एका गावाची आणि तिथल्या आजारी पडलेल्या राजकन्येचा ही गोष्ट आहे. तिथलं संगीत का बरं गायब झालं होतं? वेगवेगळे गायक, वादक मिळून काही जादू करतात का? हे या धम्माल म्युझिकल मध्ये बघा.
19 फेब्रुवारी म्हणजे आपल्या लाडक्या शिवाजी महाराजांचा वाढदिवस. शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त घेऊन येत आहोत महाराजांचं साहस आणि चातुर्य गोष्टींमधून मुलांपर्यंत पोहोचवणारा हा कार्यक्रम. लहानमोठ्या सगळ्यांनाच या गोष्टी आवडतील. पोवाडा हा कलाप्रकार बघतानासुद्धा मजा येईल. एकत्र मिळून हा शिवजन्म साजरा करू या.