आई-बाबांची भूमिका निभावताना अनेक प्रश्नांना सामोरं जावं लागतं. या संदर्भातलं कुठलंच प्रशिक्षण आपण घेतलेलं नसतं. प्रत्येकालाच मुलांना बेस्ट द्यायचंय पण हे बेस्ट देणं म्हणजे काय? पालकांच्या या शाळेतून मुलांचा अभ्यास, हट्टीपणा, आरोग्य, स्क्रीन टाईम, अशा अनेक विषयांवर पालकांना मार्गदर्शन मिळतं.