पुस्तक खिडकी ही एक अनोखी बुकशेल्फ आहे. कपाटात ठेवून दिलेली पुस्तकं आपणहून काढून मुलं फारशी वाचत नाहीत. पण मुलांच्या डोळ्यासमोर पुस्तकं राहतील, सहज स्वतःच्या हाताने काढून घेता येतील अशी सोय असलेली ही कापडी बुकशेल्फ तुम्ही भिंतीवर लावू शकता, उंचीनुसार टांगून ठेवू शकता. गठ्ठा करून ठेवलेल्या पुस्तकांपेक्षा यात ठेवलेली पुस्तकं मुलांना सहज दिसतात, उत्सुकता वाटून जास्त वाचली जातात असा अनुभव आहे. पालक दर काही दिवसांनी यातली पुस्तकं बदलून ठेवू शकतील.
पुस्तकांची ही खिडकी मुलांसाठी कल्पनाशक्तीची, उत्सुकतेची, वाचनाची दारं खुली करेल!
मोठ्या पुस्तक खिडकीला : आठ कप्पे आहेत आणि प्रत्येक कप्प्यात २-३ पुस्तकं मावू शकतात. पुस्तक खिडकीला टांगण्यासाठी मेटलचा हँगर दिला आहेच शिवाय दोन कापडी लूप्स दिले आहेत जे तुम्ही गरज पडल्यास वापरू शकता.
छोट्या पुस्तक खिडकीला : पाच कप्पे आहेत आणि प्रत्येक कप्प्यात २-३ पुस्तकं मावू शकतात. पुस्तक खिडकीला टांगण्यासाठी मेटलचा हँगर दिला आहेच शिवाय दोन कापडी लूप्स दिले आहेत जे तुम्ही गरज पडल्यास वापरू शकता.