या वेळचा अंक हा गडबड-गोंधळ या थीमवर आधारित आहे आणि अंकात भरपूर मजा उडवून देणारी गडबड आहे जी मुलांबरोबर बघताना, वाचताना आईबाबांना सुद्धा नक्की मजा येईल.
मुलांच्या नजरेतून गडबड गोंधळ म्हणजे नक्की काय? त्यांना गडबड झाली की खो खो हसू येतं. मित्रमैत्रिणींबरोबर गोंधळ घालायला आवडतं. उलट-पुल्ट गोष्टींची गंमत त्यांना वाटते. याउलटआपल्या दिनक्रमात एखादी गडबड झाली की आपण वैतागतो. मुलांमुळे गडबड-गोंधळ झाला की आपली चिडचिड होते. अशा प्रसंगांकडे आपण कोणत्या दृष्टिकोनातून बघतो, कशी प्रतिक्रिया देतो यावर अवलंबून असतं की घरात आरडा-ओरडा, रागवा-रागवी होणार आहे की सगळ्यांची हसून हसून मुरकुंडी वळणार आहे.
या वेळचा अंक हा गडबड-गोंधळ या थीमवर आधारित आहे आणि अंकात भरपूर मजा उडवून देणारी गडबड आहे जी मुलांबरोबर बघताना, वाचताना आईबाबांना सुद्धा नक्की मजा येईल.