राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त मुलांसाठी एक धमाल अनुभव !!
हातांची जादू – वैज्ञानिक खेळणी कार्यशाळा
या कार्यशाळेत मुलं स्वतःच्या हाताने साध्या साहित्यापासून सोपी वैज्ञानिक खेळणी तयार करायला शिकतील. फुगे, स्ट्रॉ, पाईप, कागद, दोरा अशा रोजच्या वापरातील वस्तूंच्या मदतीने विज्ञानाची गंमत अनुभवता येईल.
खेळ बनवताना मुलांना त्यामागील विज्ञान समजेल. मुलांच्या निरीक्षण, विचार आणि कल्पनाशक्तीला चालना मिळेल.
कुठे आणि कधी ?
हातांची जादू – सोपी वैज्ञानिक खेळणी बनवूया
मार्गदर्शक: शिवाजी माने
वयोगट: 3+
तारीख: 28 फेब्रुवारी 2026
वेळ: संध्याकाळी 5 ते 6.30
स्थळ: अक्षरनंदन शाळा, एस.बी. रोड, गोखलेनगर, पुणे
तिकीट: ₹350 (1 मूल + 1 पालक)
तिकिटासाठी संपर्क: 9307874027
मर्यादित जागा