मुलांना गुंतवून ठेवता येईल, त्यांच्या डोक्याला चालना मिळेल आणि त्यांना मजासुद्धा येईल अशा ऍक्टिव्हिटीज आपण नेहेमीच शोधत असतो. 'चिकूपिकू Activity Book' याच उद्देशाने तयार केले आहे. मऊ कापूस, गुळगुळीत कागद, लोकर यासारख्या गोष्टी वापरून, चिकटकाम, कातरकाम आणि रंगकाम करून पुस्तकातली कोलाज आणि चित्रं तयार करायची आहेत. यासाठीचे काही समानसुद्धा या किटमध्ये आहे.
पुस्तकातल्या ऍक्टिव्हिटीज करताना मुलांना वेगवेगळ्या प्रकारचं साहित्य हाताळता येईल. त्यांना वेगवेगळ्या प्रकारची टेक्श्चर्स समजतील. स्वतःच्या हातांनी काम केल्यानंतर पूर्ण झालेली चित्रं बघतानाचा मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद अमूल्य असेल!
यामध्ये असलेल्या काही activities - लोकर, सॅण्ड पेपर, कापूस, वेगवेगळे कागद इत्यादी