येत्या दिवाळीत एक भन्नाट कार्यक्रम घेऊन येतोय ... चालता बोलता दिवाळी अंक! म्हणजे काय तर दिवाळी अंकात असतात तशा गोष्टी, किस्से, गाणी आणि नाटुकली प्रत्यक्ष तुमच्यासमोर सादर होणार आहेत. दिवाळी अंक चक्क तुमच्याशी बोलणार आहे आणि त्यातल्या गोष्टी, नाटुकलीमधली धमाल समोर उलगडून दाखवणार आहे. म्हातारीची वाघाशी भेट, भेळ खायला निघालेला सिंह आणि इतर प्राण्यांची जंगलातली मजा यात असेल. मुलांच्या सुट्टीची सुरुवात या खास दिवाळी अंकाने करू या. हा चालता बोलता दिवाळी अंक बघायला नक्की येताय ना? सुखायन आणि युवाक्षर यांच्या समवेत हा भन्नाट कार्यक्रम आयोजित करत आहोत. नक्की या... वाट बघतोय.