उड्या मारू, नाचू, गाऊ, खेळू, लोळू, मज्जा करू
चिकूपिकूचा हा खेळ विशेषांक आहे. सगळ्याच लहान मुलांना खेळायला खूप आवडतं. त्यांच्यामध्ये इतकी ऊर्जा असते की ती सतत खेळतात. हालचाल करतात, उड्या मारतात, खिडकी- दरवाजांवर चढतात, नाच करतात अशी धम्माल ते सतत करत असतात. याचं कारण खेळ आणि हालचाली हा जणू त्यांच्यासाठी ऑक्सिजन आहे. खेळ हा मुलांचा फुल-टाईम जॉब आहे.
चिकूपिकूच्या या सुट्टी विशेषांकात खेळच खेळ आहेत. घरात खेळायचे, पार्किंगमध्ये खेळायचे, आई-बाबांबरोबर खेळायचे, क्रिएटिव्हिटीचे, शारीरिक हालचालींचे असे भरपूर खेळ या दोन महिन्यात मुलांना खेळता येतील. काही खेळ मुलं स्वतः शोधून काढतील. मुलांबरोबर आपणही हे खेळ खेळून बघू या!
चिकू-पिकू मासिकाच्या अंकांची मांडणी मुलं आणि आई-बाबा यांचा विचार करून केलेली आहे. टीव्ही, मोबाईलचा वापर कमी करून, मुलांना योग्य प्रकारे engage करण हा आमचा मुख्य उद्देश आहे. अंकातील गोष्टी मुलांना मोठ्याने वाचून दाखवूयात. मुलं गोष्टींमध्ये रमतात आणि आई-बाबांशी नव्याने जोडली जातात. मासिकातल्या activities मुलांसोबत आपणही करूयात.
नोट: चिकूपिकू मासिकाच्या वार्षिक वर्गणीमध्ये ( Yearly Subscription) सुट्टी विशेषांक आणि दिवाळी विशेषांक हे मोठे जोड-अंक समाविष्ट केलेले आहेत. त्यामुळे वर्गणीदारांनी दिवाळी विशेषांक स्वतंत्र विकत घेऊ नये.
Age Group |
1+ |
---|---|
Language |
Marathi & English |
ISSN |
RNI TC No. MAHBIL10083 |
Binding |
Paperback |
No. of Pages |
68 (All four coloured) |