फेब्रुवारी महिना चिकूपिकूसाठी खास आहे, कारण हा आहे Birthday Month.
यावर्षी चिकूपिकू ७ वर्षांचं होत असून त्यानिमित्ताने हा खास “७ वा वाढदिवस स्पेशल” अंक तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.
सात म्हटलं की आठवतात सात रंग, सात सूर, सात वार आणि अनेक मजेशीर गोष्टी !! अशाच सात या अंकाची मजा सांगणाऱ्या गोष्टी आणि गमती या अंकात आहेत.
या अंकात मुलांना वाचायला आणि ऐकायला मिळेल
– “वेडात मराठे वीर दौडले सात” या गाण्यामागची गोष्ट
सात रंग आणि सात स्वरांप्रमाणेच आनंद, कल्पनाशक्ती आणि शिकण्याची गंमत घेऊन चिकूपिकू दर महिन्याला तुमच्यापर्यंत येत राहील.
हा खास ७ वा वाढदिवस स्पेशल अंक नक्की वाचा आणि चिकूपिकूचा हा आनंदी प्रवास तुमच्या मुलांसोबत साजरा करा.