चिकूपिकू चा ‘Wow’ विशेषांक! या अंकात आहेत लाडवासारख्या खमंग गोष्टी, करंजी सारख्या गोड कविता, चकली सारखी कुरकुरीत कोडी, चिवड्यासारखे खुसखुशीत खेळ, अनारश्यांसारखे हसरे किस्से आणि आणि कडबोळी सारख्या मजेशीर Activities! चला, गोष्टींचा फराळ करू या ! बरोब्बर, या वेळच्या दिवाळी विशेषांकाची थीम आहे.. 'अद्भुत'! विविध अद्भुत गोष्टी टिपायचा आणि साठवायचा प्रयत्न आम्ही या विशेष दिवाळी अंकात केला आहे. चांदोबाची मैत्रीण, काजवराणी, स्वप्नांची खोली, शब्दांचं गाठोडं, सायकलवरचं घर अशा भरपूर गोष्टी ह्या अंकात आहेत तसेच ‘देते कोण देते कोण’, ‘फुले फुले ढोले ढोले’, ‘अट्टम पट्टम घट्टम’ अशा रंजक कविता सुद्धा आहेत. चला तर मग, यंंदाच्या दिवाळीच्या सुट्टीत मुलांंबरोबर आपणही कुतूहल आणि...
चिकूपिकूच्या वार्षिक सबस्क्रिप्शनमध्ये काय काय आहे? वर्षभरात १० अंक - सुट्टी आणि दिवाळी विशेषांक या दोन मोठ्या जोड-अंकांसहित फ्री शिपिंग अंकातल्या सगळ्या गोष्टी आणि गाणी ऑडिओ स्वरूपातसुद्धा याशिवाय ३६५ ऑडिओ गोष्टी - छोट्यांचे रामायण, पंचतंत्र, बडबडगीते, कृष्णाच्या गोष्टी आणि अशाच भरपूर गोष्टी फ्री ऍक्टिव्हिटी बुक आणि बुकमार्क