“आई, अजून 5 मिनिटं मोबाईल..”

“हा game complete करतो आणि मग येतो…please…”

ही वाक्यं तुमच्या घरातही रोज ऐकायला येतात का?

मुलांचंच काय, आपलंही screen obsession दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. एकमेकांशी बोलून, चेहऱ्यावरचे हाव-भाव वाचून संवाद साधण्यापेक्षा एकतर्फी असणारा स्क्रीनचा भडिमार आपल्याला बरा वाटू लागला आहे. 

० ते ८ वयात मुलांच्या मेंदूची वाढ वेगाने होत असते. त्यासाठी त्यांना पुरेशी आणि चांगली झोप, प्रेमाची माणसं, गोष्टी, गाणी आणि प्रत्यक्ष अनुभव खूप गरजेचे असतात. ह्याच वयात मुलांच्या भाषेचा, भावनांचा विकास होत असतो, social skills तयार होत असतात. ह्या सगळ्याला 'स्क्रीन' हा खूप मोठा अडसर ठरत आहे. 

मुलांच्या आयुष्यातून स्क्रीन पूर्णपणे काढून टाकणं शक्य नसलं तरी स्क्रीनला पर्यायी खेळ, activities कुठल्या आणि कशा देता येतील? चला बघू या ह्या ब्लॉगमधून! 

Screen-free activities का? 

  • बघू नका तर करून बघा !! स्क्रीनशिवाय खेळताना मुलं प्रत्यक्ष अनुभव (hands-on learning experience) मिळतो. 
  • Creativity आणि imagination वाढते.
  • Focus सुधारतो.
  • Communication skills वाढतात.
  • Physical activity वाढते.
  • Brain development चांगली होते.

चला तर मग… काही मजेदार Screen-free activities पाहू या!

  1. गोष्टी आणि गाणी

मुलांना गोष्टी ऐकायला खूप आवडतात!

त्यांना पुस्तकं वाचून दाखवा, गाणी म्हणा, action songs करा.

  • Language skills improve होतात
  • Vocabulary वाढते
  • Imagination वाढते
  1. चित्रकला आणि रंगकाम

चित्रकला आणि रंगकाम करायला मुलांना खूप आवडतं. मुलांना crayons, sketch pens द्या आणि त्यांना हवं तसं चित्र काढू द्या. 

  • कल्पकता वाढते
  • Hand-eye coordination सुधारते 
  • मनावरचा ताण कमी करते 
  1. Puzzles आणि Brain-based toys

Jigsaw puzzles, शब्दकोडी, वेगवेगळ्या आकारांमधून चित्र बनवणे असे खेळ नक्की खेळा. 

  • Logical thinking वाढते
  • Problem-solving skills सुधारतात
  • Observation skills वाढतात
  1. DIY Craft Activities

Origami, greeting cards, किल्ला, आकाशकंदील - मजा आणि शिकणं दोन्ही!

  • कात्री वापरताना, कागदाच्या घड्या घालताना मुलांची fine motor skills सुधारतात
  • Creativity वाढते
  • हातानी हातांनी काम करायची सवय लागते
  1. Role Play 

मी डॉक्टर होतो !”, “मी शेफ!” - मुलांना त्यांच्या दुनियेत रमू द्या.

  • Social skills वाढतात
  • Imagination वाढते
  • दुसऱ्याचा भूमिकेत जाऊन विचार करण्याची क्षमता वाढते 
  1. Simple Science Experiments

घरच्या घरी छोटे experiments करा - science becomes fun!

अरविंद गुप्तांच्या website वर दिलेली खेळणी तुम्ही सुट्टीच्या दिवशी मुलांबरोबर नक्कीच बनवू शकता. 

  • कुतूहल वाढतं
  • Observation skills सुधारतात
  • शिकायला मजा येते
  1. Music आणि Dance

मुलांच्या आवडीची गाणी म्हणा, त्यावर नाच करा. वेगवेगळ्या नाचाच्या आणि गाण्याच्या कार्यक्रमांना घेऊन जा.

  • Physical activity वाढते
  • कान तयार होतो 
  • ताल-सुराची जाण वाढते
  1. Nature Activities

"चला ट्रिपला जाऊ या" असं म्हणून जवळच्या टेकडीवर जा, बागेत घेऊन जा, झाडं लावा, प्राणी-पक्षी बघा! यामुळे मुलांच्या लहानपणीच्या सहलीच्या आठवणी तयार होतील. 

  • Environmental awareness वाढतो
  • निसर्गाशी नातं तयार होतं 
  1. मैदानी खेळ

लपाछपी, क्रिकेट, सायकल - Pure Fun & Exercise

  • Stamina वाढतो
  • Teamwork आणि social skills वाढतात
  1. पालकांसोबत खेळ आणि त्यांचा वेळ 

हा खरंतर सगळ्यांत महत्त्वाचा मुद्दा आहे. मुलं अनुकरणातून शिकतात हे तर आपल्याला माहितीच आहे.

  • Mobile बाजूला ठेवा (खरंच!)
  • मुलांसोबत खेळताना पूर्ण लक्ष द्या, त्यांचं म्हणणं ऐकून घ्या 
  • रोज थोडा वेळ तरी “family play time” ठेवा
  • घरासाठी काही स्क्रीनचे नियम ठरवून घ्या - जेवताना,झोपताना फोन कुणीच वापरायचा नाही
  1. चिकूपिकू 

चिकूपिकूच्या मासिकांमध्ये आणि त्यांच्या website वर मुलांना करण्यासाठीच्या अनेक Screen-free Activities आहेत. सोबतच पालकांसाठी मुलांचा Screen Time कसा कमी करायचा यासाठी मार्गदर्शन करणारे अनेक podcasts आहेत. ते नक्की बघा. https://www.youtube.com/watch?v=hCADKA25cV8

मुलांना आवडतील अशा activity sheets आणि अजूनही काही धमाल गोष्टी आहेत. आणि त्याही अगदी फ्री! https://chikupiku.com/pages/freebies

मुलांना screen पासून दूर ठेवणं म्हणजे फक्त “नाही” म्हणणं नाही…

तर त्यांना जास्त मजेदार पर्याय देणं आहे!

मुलांना प्रत्यक्ष अनुभव देऊन, हातांनी काम करायची सवय लावून, विज्ञानाची आणि निसर्गाची गोडी लावून, भरपूर गाणी-गोष्टी सांगून त्यांचं बालपण अधिक समृद्ध आणि आनंददायी बनवू या.