पावसाळ्यातला मुलांचा आहार कसा असावा?
लेखक : डॉ. विभुषा जांभेकर
सध्या सगळीकडे जोरात पाऊस सुरु आहे. पावसाळ्यात मुलांच्या शाळांसोबतच पावसात भटकणं, मजा करणं, चमचमीत खाणं पण सुरु होतं आणि मग काय, वेगवेगळ्या आजरांना निमंत्रण मिळतंच. एकीकडे चमचमीत खावंसं पण वाटतं आणि दुसरीकडे आजारी पडायची भीती! आणि घरातली लहान मुलं आपलं काही ऐकत नाहीत, त्यांना सगळं चटपटीत हवं असतं. अशा वेळी मुलांना डब्यात काय द्यायचं, आजारी पडू नये म्हणून काय करायचं?
पावसाळ्यात मुलांच्या आहारात बदल करण्याची खरंच काय गरज आहे?
-
वातावरणातील बदल: पावसाळ्यात हवामान बदलते, हवा दमट होते आणि सूर्यप्रकाश कमी मिळतो.
-
शरीरातील बदल: आपल्या शरीरातील metabolism आणि digestive system थोडी मंदावते.
-
आजारांचा वाढता धोका: दमट हवामानामुळे जंतूंची वाढ जलद होते. यामुळे पोटाचे विकार, सर्दी, खोकला, आणि Food/ Waterborne Infection चा धोका वाढतो.
-
प्रतिबंधात्मक दृष्टीकोन: औषधोपचारांपेक्षा प्रतिबंध नेहमीच चांगला असतो.
मुलांसाठी आहारात नक्की काय असावं?
पावसाळ्यातला आहार हा पचायला हलका, नैसर्गिकरित्या detoxification करणारा आणि शक्यतो कोमट किंवा गरम असावा.
-
Local आणि Seasonal पदार्थ द्यावेत.
-
धान्य : धान्यांमध्ये शक्यतो हातसडीचा तांदूळ, ज्वारी, बाजरी, नाचणी, राजगिरा, वरीचे तांदूळ, राळे यांसारखी मिलेट्स.
-
डाळी : मूग डाळ, मसूर डाळ (तूर डाळ, सूट होत असल्यास).
-
कडधान्ये : मूग, मसूर, चवळी, मटकी (वाफवून किंवा पूर्ण शिजवून) यांना चाट किंवा उसळीच्या स्वरूपात देऊ शकता.
-
फळभाज्या : दुधी भोपळा, लाल भोपळा, दोडका, पडवळ, तोंडली (या चवीने गोड असतात) आणि इतर फळभाज्या.
-
फळे : सगळी seasonal फळं.
-
पेये : भाज्यांची सूप्स, सुंठ किंवा हळद घालून दूध
-
नॉन-व्हेज पदार्थ : ऑम्लेट, भुर्जी, उकडलेले अंडे, चिकन सूप (प्रमाण कमी असावं)
हा आहार देताना हे लक्षात घेणं गरजेचं आहे की आपली मुलं आता या अशा वयात आहेत की त्यांची strength भरपूर असायला पाहिजे. त्यामुळे आहार पचायला हलका जरी असला तरी पौष्टिक असावा, light आहार नको.
पावसाळ्यात मुलांच्या आहारात काय टाळावं किंवा मर्यादित ठेवावं?
-
कच्चे पदार्थ : सॅलड, कच्चे sprouts यांसारखे पदार्थ टाळा, कारण त्यात जंतू संसर्गाचा धोका जास्त असतो.
-
पालेभाज्या : पालेभाज्या शक्यतो टाळा, कारण त्या पोट बिघडवू शकत आणि चांगल्या उपलब्ध नसतात.
-
गहू : पचायला जड असतो.
-
चणा डाळ, वाटाणे, छोले, राजमा : हे पचायला खूप जड असतात.
-
रेड मीट (मटण) आणि मासे : मटण पूर्णपणे टाळावे. मासे देखील टाळावेत, कारण हा त्यांचा प्रजनन काळ असतो.
-
दही, ताक : दही आणि ताक हे कफ वाढवू शकतात, त्यामुळे कमी प्रमाणात द्या.
-
थंडगार पदार्थ : मिल्कशेक, थंड पाणी यांसारख्या थंडगार गोष्टी टाळा.
-
बाहेरचे खाद्यपदार्थ : शिळे किंवा फ्रोझन पदार्थ, तळलेले पदार्थ, मॅगी, नूडल्स, स्ट्रीट फूड
मुलांची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी काही टिप्स
-
तुळस : Anti-Infective, Antipyretic असल्याने कफ बाहेर काढायला मदत करते. सकाळी १-२ तुळशीची पाने मुलांना खायला द्या.
-
हळद, आले, मिरी : कोमट पाण्यात हळद घालून देणे, जेवणातील पदार्थांमध्ये आल्याचा कीस, सूपमध्ये मिरपूड घेऊ शकता.
-
घरगुती खोकल्याची गोळी : किसलेला गूळ, हळद, सितोपलादी चूर्ण आणि जेष्ठमध एकत्र करून लहान गोळ्या बनवून मुलांना चघळायला द्या.
-
लसूण, कढीपत्ता : रोजच्या भाज्या, चटणी यात वापरू शकता.
मुलांना डब्यात काय द्यावं? dos आणि don’ts
-
डब्यातील पदार्थ २-३ तास टिकणारे आणि खराब न होणारे असावेत.
-
पावसाळ्यात कच्चे पदार्थ (उदा. कोशिंबिरी, कच्चे कडधान्य) शक्यतो टाळावेत.
-
शाळेत जाताना उकळलेल्या पाण्याची बाटली आवर्जून द्या.
-
पालेभाज्यांच्या ऐवजी फळभाजी, गवार, घेवडा अशा शेंगवर्गीय भाज्या द्या.
-
मुलं भाज्या खात नसतील तर त्यांची कटलेट्स, डोसे, पराठे, थालिपीठं, फ्राईड राईस, सूप्स पावभाजीमध्ये घालून देऊ शकता.
-
मिलेट्सचे डोसे, कटलेट्स, थालीपीठे, पुलाव असे पदार्थ.
मुलांच्या आरोग्यासाठी आहाराव्यतिरिक्त इतर महत्त्वाच्या सवयी कोणत्या?
-
मुलांना स्वयंपाकात सहभागी करा : भाज्या निवडताना किंवा रेसिपी बनवताना मुलांना सोबत घ्या, त्यामुळे त्यांना पदार्थांबद्दल कुतूहल निर्माण होईल आणि त्यांना आवड निर्माण होऊ शकते.
-
नकारात्मक बोलणे टाळा : मला ही भाजी नको, मला ही भाजी आवडत नाही हे मोठ्यांनी बोलणं टाळा. म्हणजे मुलंही सगळ्या भाजा खातील.
-
पुरेसा व्यायाम : मुलांनी भरपूर व्यायाम करावा, कारण यामुळे मेटाबॉलिझम सक्रिय राहते आणि पचनशक्ती सुधारते.
-
पुरेशी झोप : मुलांना पुरेशी झोप मिळणे आवश्यक आहे. झोपेतच शरीराची दुरुस्ती आणि वाढ होते.
जशी पावसाळ्यात झाडांना नवी पालवी फुटते, तशीच आपल्या शरीरातही detoxification ची प्रक्रिया चालू असते. योग्य आहार घेऊन आपण आपल्या शरीराच्या बागेला योग्य खतपाणी घालून ती अधिक हिरवीगार आणि निरोगी ठेवू या.
या विषयावरचा चिकूपिकूचा " पावसाळ्यातला मुलांचा आहार कसा असावा? " हा डॉ. विभूषा जांभेकर यांच्याशी साधलेला सवांद नक्की पहा. डॉ. विभूषा जांभेकर या Clinical Nutritionist असून Early Childhood Nutrition Specialist सुद्धा आहेत.
This blog is based on our Parenting Podcast - Monsoon health tips and foods to have avoid this rainy season. Do watch the full podcast here!