ChikuPikuChikuPikuChikuPiku

Curious copycat

टकामका बघत आणि अनुकरण करत ही चिमुरडी मुलं स्वतःचं स्वतः शिकत असतात. मूल जन्माला येतं तेव्हा त्याच्या मेंदूत असंख्य सुटे सुटे न्यूरॉन्स असतात. जसजसे नवे अनुभव त्याला मिळतात तसे न्यूरॉन्स जुळायला लागतात. त्यातून स्मरणशक्ती, बुद्धिमत्ता विकसित व्हायला लागते.

चिकूपिकूची साथ

गोष्टी, चित्रं, गप्पा, गाणी यांचे अनुभव चिकूपिकूच्या अंकातून मुलांना मिळतात. नवीन न्यूरॉन कनेक्शन्स तयार होतात. पुस्तकांमध्ये मुलं छान रमतात.

अंकाचा वापर

  • रंगीत चित्रं बघायला मुलांना आवडतात. चित्रं दाखवून वेगवेगळ्या प्राण्यांची आणि कॅरेक्टर्सची ओळख करून देता येईल.  
  • जेवण भरवताना चित्रं आणि गोष्टींचा उपयोग होईल.
  • झोपवताना ऑडिओ गोष्टी ऐकवता येतील.
  • ठेक्यातली बडबडगीतं मुलांना म्हणायला आवडतील. पाठसुद्धा होतील.
  • चित्रांवरून गोष्टी सोप्या पद्धतीने सांगता येतील.
  • हा हत्ती काय करतोय? तू काय करशील? मासा कुठे आहे? असे प्रश्न विचारता येतील.
  • खडू, पेन्सिल देऊन ॲक्टिव्हिटीजची पानं समोर ठेवू या. रेघोट्या ओढल्या, पान फाटलं तरी हरकत नाही.

Little boy enjoying the magazine along with his mother
Boy watching mobile phone

स्क्रीन टाईम

Unicef ने आणि इतर संशोधकांनी केलेल्या अभ्यासानुसार २ वर्षांपर्यंत मुलांना अजिबात स्क्रीन दाखवू नये असं सांगितलं आहे. कार्टून्स मुलांना आवडतात कारण सेकंदा-सेकंदाला बदलणारी चित्रं त्यात असतात. सतत स्क्रीन बघितल्याने मेंदू फक्त माहिती घेत राहतो. विचार करायचा थांबतो. थकून जातो. त्याच्या कार्यक्षमतेला मर्यादा येते. स्क्रीनटाईम कमी करून त्याऐवजी घरगुती खेळ, पुस्तकं, गप्पा, बागेत किंवा बाहेरचा फेरफटका यात मुलांना रमवण्याची सवय प्रत्येक घराने लावून घ्यायला हवी.

खाणं-पिणं आणि वाढ

१ – ३ वर्षांमध्ये मुलांची वेगाने वाढ होते. मेंदू, पचनसंस्था, रोगप्रतिकारशक्ती विकसित होत असते. हेच योग्य वय आहे अन्न, चवी, रंग, texture या सगळ्यांशी एक छान नातं तयार होण्याचं. काही टिप्स….

  • ओमेगा ३ फॅट्स लहान वयात मिळाले तर मेंदूच्या पेशींची संख्या वाढायला मदत होते. वयाच्या तिसऱ्या वर्षानंतर ती संख्या वाढत नाही. म्हणून बदाम, अक्रोड, तीळ, गायीचे दूध , जवस हे पदार्थ नियमित मुलांना द्यावे.
  • शक्यतो साखरेचा वापर कमीत कमी करावा.
  • गोड दूध हवं असेल तर खजूर, खारीक घालता येईल.

  • दूध द्यायला सुरुवात करताना साखरेशिवाय द्यावं म्हणजे मुलांना त्याच्या मूळ चवीची ओळख होते.  
  • आज आपण जेवायला काय करणार आहोत याविषयी मुलांशी आवर्जून बोलू या.
  • वरचं दूध द्यायला सुरुवात करताना साखरेशिवाय द्यावं म्हणजे मुलांना त्याच्या मूळ चवीची ओळख होते.  

  • भाज्या निवडणे, फळं सोलणे, चिरणे या कामात मुलांना सहभागी करून घेऊ या . 
  • दिवसभरात एकदा तरी संपूर्ण कुटूंबाने एकत्र जेवण करू या . 
  • स्वतःच्या हाताने खाण्यास प्रोत्साहन देऊ या
  • स्क्रीन दाखवत जेवण भरवू नये.

Mother feeding her child
Girl sleeping with teddy a bear in her arms

झोप महत्त्वाची

१ ते ३ मधल्या मुलांना दिवसभरात साधारण १२ तासांची झोप आवश्यक असते. मुलांच्या वाढीसाठी आवश्यक एन्झाईम्स झोपेतच तयार होतात. मुलं दिवसभरात दोनदा डुलकी घेऊ शकतात आणि रात्री सलग झोपतात.

झोपताना काय करावं ?

  • मुलांनी रात्री लवकरात लवकर झोपायला हवं. रात्री १० आणि त्यापुढच्या वेळा मुलांनी घड्याळात खरंतर बघायला नकोत.  
  • मुलांची झोपण्याची जागा निश्चित असावी.
  • झोपेची वेळ ठरवून घ्यावी. ती वेळ घरातल्या माणसांनी पाळावी.
  • पडदे लावून, दिवे घालवून, शांत गाणी किंवा गोष्ट सांगत मुलांना झोपवता येईल.
  • झोपताना मुलांना स्क्रीन अजिबात दाखवू नये.

Sunday,Monday,Tuesday,Wednesday,Thursday,Friday,Saturday
January,February,March,April,May,June,July,August,September,October,November,December
Not enough items available. Only [max] left.
Shopping cart

Your cart is empty.

Return To Shop

Add Order Note Edit Order Note
Estimate Shipping
Add A Coupon

Estimate Shipping

Add A Coupon

Coupon code will work on checkout page