शोभा भागवत लिखित ‘आपली मुलं’ या पुस्तकातील लेख
लेख क्र. 12 : गप्पांना निमित्त
लेखन: शोभा भागवत
प्रकाशक: राजहंस प्रकाशन, पुणे
आपलं मूल आहे तरी कसं हे समजून घेण्यासाठी, त्याला बोलकं करण्यासाठी हे विषय, प्रश्न, गमतीत खेळत खेळत यातले विषय काढायचे. मूल काय बोलतं ते नीट ऐकायचं. समजून घ्यायचं. ही परीक्षा नव्हे. ह्या प्रश्नात आपण प्रसंगानुसार भर घालत जायची.
- आवडता रंग
- आवडतं फूल
- आवडतं गाव
- आवडता लेखक
- आवडता ऋतू
- आवडतं नाव
- आवडतं काम
- आवडता खेळ
- आवडतं पुस्तक
- आवडतं माणूस
- आवडता चित्रपट
- आवडतं गाव
- काय काय करायला आवडतं ?
- खूप आनंद कशानी होतो ?
- खूप वाईट कशानी वाटतं ?
- कोणी वाईट म्हटलं की वाईट वाटतं ? किती ?
- अनोळखी माणसांशी बोलायची लाज वाटते ?
- भीती वाटते का ?
- घरातलं वातावरण आनंदी ठेवायला काय करतेस ?
- भीती कशाकशाची वाटते ?
- राग कशाचा येतो ?
- राग आला की काय करतेस ?
- भीती वाटली की काय करतोस ?
- वाईट वाटलं की काय करतेस ?
- घरातल्यांबद्दल कधी प्रेम कधी द्वेष असं वाटतं का ?
- नेहमी आनंदी राहावं असं वाटतं ?
- नशीबवान आहेस असं केव्हा वाटतं ?
- कमनशिबी आहेस असं केव्हा वाटतं ?
- घरात खेळायला आवडतं का बाहेर का ?
- घरी आलं की छान वाटतं का ?
- शाळेत सर जे सांगतात ते सगळं खरं मानतेस?
- स्वप्नं पडतात ? कसली ?
- आईवडलांच्या परवानगीशिवाय काय काय करतोस ?
- आईवडलांचं तुझ्यावर प्रेम जास्त की भावंडांवर ?
- तुला आई आवडते ? का ? का नाही ?
- वडील आवडतात ? का ? का नाही ?
- कुणी मारलं की काय वाटतं ?
- कशी माणसं आवडतात ?
- कोणते पदार्थ आवडतात ? यादी कर.
- काय शिकायला आवडेल ?
- काय चांगलं करता येतं ?
- कशी माणसं आवडत नाहीत ?
- लोकांना मदत करतेस ? कोणती ?
- स्वच्छ आहेस का ?
- वेळेचं महत्व कळतं का ?
- शाळेचा अभ्यास नियमितपणे करतेस ?
- वर्गात काही कळलं नाही तर प्रश्न विचारतेस ?
- मित्रांशी भांडणं होतात ? कोणाची चूक ?
- भांडणं घरी सांगतेस ? का ? का नाही ?
- आईवडलांना खूष करायला काय करतेस ?
- कोणाबरोबर अभ्यास करायला आवडतो ?
- आपल्यापेक्षा हुशार मुलांशी की ढ ? का ?
- दुसऱ्यांच्या घरी जायला आवडतं का ?
- शिक्षेची भीती वाटते का ?
- काय काय खेळायला आवडतं ?
- सर्वात मोठा गुण कोणता ?
- कोण व्हावंसं वाटतं ?
- कोणाबद्दल आदर वाटतो ?
- कशाची काळजी वाटते ? का ?
- इतरांशी मैत्री कशी करतेस ?
- लोकांना तू का आवडतेस ? का आवडत नाहीस ?
- लोकांचं लक्ष वेधून घेण्यासाठी काय करतोस ?
- आईवडलांच्या तुझ्याकडून काय अपेक्षा आहेत ?
- इतर मित्रांच्या घरचं काय काय आवडतं ?
- कशाकशाचा छंद आहे ?
- तुझी प्रकृती कशी आहे असं वाटतं ?
- तू दिसतोस कसा ? सुरेख ? साधारण ? वाईट ?
- मुलींबद्दल / मुलांबद्दल काय वाटतं ?
- पैसे जबाबदारीने खर्च करायचे असतात हे पटतं ?
- गोळ्या किती खातेस ?
- भाज्या खातेस का ?
- कोशिंबिरी खातोस ?
- घरात केलेल्या सगळ्या पदार्थांची चव पाहतोस ?
- चहा, सरबत, कोशिंबीर करता येते ?
- घरात आईला कोणकोणती मदत करतोस ?
- स्वतःचे कपडे स्वतः दुरुस्त करतोस ? बटणं लावतोस ?
- केर काढता येतो का ?
- कमीपणा वाटतो ?
- आपले घर स्वच्छ ठेवण्यासाठी काय काय करतोस ?
- आपले कपडे आवरतोस ?
- आपली पुस्तके जपतोस ?
- वस्तू शाळेत हरवतात ? का ?
- व्यायाम कोणता करतोस ?
- बुद्धी वाढवणारे खेळ आणि नुसते वेळ घालवायचे खेळ यातला फरक कळतो ?
- अंघोळ केल्यावर ओले कपडे उचलून ठेवतोस ?
- झोपताना दात घासतोस ?
- जेवणापूर्वी हात धूतोस ?
- नखं कापतोस का ? कापून घेतोस का ?
- अंघोळ करताना सगळे भाग स्वच्छ धूतोस ?
- तू घरात एकटा असताना पाहुणे आले तर काय करशील ?
- अंधारात वाचतोस का ?
- बाहेर जाताना घरात सांगून जातोस ?
- किती वाजता परत येणार ते सांगतेस ? वेळ पळतेस ?
- आपल्याला घरात अमुक एक आणायचंय् तर तुझं त्याबद्दल काय मत आहे ?
- एक सल्ला दे ना जरा. उद्या जेवायला काय करू ?
- आज तुझा खूप वेळ खेळण्यात गेला नाही का ? मला काळजी वाटतेय् अभ्यासाची. तू काय विचार केलास त्याबद्दल?
- कशाचं तरी वाईट वाटत असतं म्हणूनच मुलं हट्ट करतात, वाईट वागतात. तू का बरं भांडलास बहिणीशी ?
- सध्या तुला नवे मित्र मिळालेले दिसतात. काय त्यांची नावं ?
- कशी आहेस ती मुलं ? तुला त्यांच्यात काय विशेष गुण दिसतात ?
Read More blogs on Parenting Here