लेखक : चिकूपिकू
जीन डिच हे अमेरिकेतील सुप्रसिद्ध चित्रकार, दिग्दर्शक आणि अॅनिमेटर होते. त्यांनी Tom & Jerry आणि Popeye या सुप्रसिद्ध कार्टूनच्या काही सिरीजचं दिग्दर्शन केलं. त्यांनी अनेक कार्टून्सची चित्रं काढली आणि त्याचं अॅनिमेशनसुद्धा केलं. चित्रांमध्ये जीव ओतून मुलांच्या जगात उतरवलं. जीन डिच यांनी दिग्दर्शित केलेल्या “Munro” नावाच्या अॅनिमेटेड शॉर्ट फिल्मला 1960 मध्ये ऑस्कर पुरस्काराने सन्मानित केले होते. ती फिल्म मुलांबरोबर बघता येईल.

(Watch the short film Munro: https://www.youtube.com/watch?v=M_cH8aDlHsE )
आपली मुलं पुस्तकातील, कार्टूनमधील characters नेहमी बघतात. ती चित्रं कोणी काढली? त्यांचे हावभाव कसे आहेत? याविषयी मुलांशी गप्पा मारायला हव्यात. जीन डिच यांसारख्या दिग्गजांची, त्यांच्या कामांची ओळख मुलांना करून द्यायला हवी. त्यासाठी डीजीटल मिडियाचा योग्य वापर करता येईल. खाली जीन यांनी तयार केलेल्या ‘सिडनी द एलिफंट’ या कॅरेक्टर्सची काही चित्रं दिली आहेत. मुलांना चित्रं दाखवूया. ‘सिडनी द एलिफंटची’ ५ मिनिटांची छोटी फिल्मसुद्धा पाहूया. आपण मुलांनासुद्धा एखाद्या गोष्टीमधील पात्रांची चित्रं काढायला सांगू शकतो. त्यांच्याबरोबर मिळून नवी गोष्ट लिहू शकतो आणि मग गोष्टीतील पात्रांची चित्रं काढू शकतो.
सिडनी नावाचा हत्ती अगडबंब दिसत असला तरी आतून खूप प्रेमळ आहे. थोडासा घाबरट सिडनी, जंगलात त्याच्या मित्रांसोबत राहतो. सिडनीच्या गमती-जमती Sidney the Elephant या कार्टून सिरीजमध्ये जीन यांनी दाखविल्या आहेत) Watch the shortfilm of Sidney the elephant with children


संकलन – आभा भागवत;
संकल्पना – प्रसाद मणेरीकर
Read More blogs on Parenting Here
Print + Audio
Only Audio
Only Magazines
Magazines
Our Combo Packs
Books By Quests
Curated
Books
Parenting Courses
Expert Talks
Books on Parenting
Parenting
Blogs