लेखक : डॉ. विभुषा जांभेकर
रोगप्रतिकारक क्षमता | Rog Pratikar Shakti | Immunity in marathi
माणसांच्या शरीरात एक यंत्रणा असते जी जिवाणू, विषाणू आणि इतर रोग निर्माण करणाऱ्या जीवांपासून आपले रक्षण करते. यालाच रोगप्रतिकारक शक्ती (Roj Pratikar Shakti) असे म्हणतात. ती अतिशय सक्षम असते आणि तिचे निरंतर कार्य हे आरोग्य चांगले राहण्यासाठी महत्त्वाचे असते. पण जेव्हा तिची कार्यक्षमता कमी होते तेव्हा आरोग्य बिघडते आणि जंतुजन्य विकार होण्याची शक्यता वाढते. तुम्ही बघत आहातच की कोरोनाव्हायरस किती कमी काळात जगभर पसरला. उष्ण आणि थंड काटिबंधतील देशात, लहान, मोठ्या सगळ्या वयातील माणसांमध्ये त्याचा किती कमी वेळात किती वेगाने प्रसार झाला. असं का बरं झालं असेल? एका डोळ्यालाही न दिसणाऱ्या विषाणूमुळे संपूर्ण जग जणू थांबले होते. याचे उत्तर आपल्याच जीवनशैलीमुळे कमजोर झालेल्या रोगप्रतिकारक शक्तीमध्ये (Roj Pratikar Shakti) आहे.
रोगप्रतिकारक शक्तीचे शरीरात ‘homeostasis’ ठेवणे हे काम असते. म्हणजे शरीरात पहारा करणे, कुठे काही बिघाड तर नाही ना हे न्याहाळणे, जर बिघाड असेल तर लगेचच ‘रेड अलर्ट ’ घोषित करणे आणि ‘repairing’ चे काम चालू करणे. यातली एखादी जरी क्रिया व्यवस्थित झाली नाही तर आपल्याला आजार होऊ शकतो. यामुळे निरोगी राहायचे असेल तर रोगप्रतिकारक यंत्रणा सक्षम ठेवण्याची जबाबदारी आपली! आपल्या रोजच्या आहारामध्ये बदल करून हे साध्य करणं सहज शक्य आहे.
जंतुजन्य विकार न होण्यासाठी काय खावे?
- फळे : पेरू, पपई, आंबा, संत्री मोसंबी यासारखी सगळी citrus फळे ही जीवनसत्व c आणि जीवनसत्व a (vitamin a precursors) नी समृद्ध असतात. यामध्ये मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात जे ‘disease fighting’ ची शक्ती वाढवतात. जीवनसत्व c हे नैसर्गिक अँटीबायोटिक म्हणून काम करते. यामुळे इन्फेक्शन लवकर कंट्रोल होते.
- भाज्या : हिरव्या पालेभाज्या (पालक, मेथी, चुका, लाल माठ, अळू इ ) मधून बिटा कॅरोटीन मिळते जे विषाणूविरुद्ध लढा देण्यासाठी गरजेचे असते.
- लिंबू : लिंबांमध्ये जीवन सत्व c असतेच पण त्याहून ही महत्त्वाचे म्हणजे लिंबाच्या सालीमध्ये flavonoids नावाचे घटक असतात. Flavonoids मुळे शरीरातील surveillance (पहारा) सिस्टमचे कार्य व्यवस्थित होते. त्यामुळे कोणताही संसर्ग झाला असेल तर त्याचा संकेत लवकर मिळतो आणि इन्फेक्शन वाढायच्या आधीच रोगप्रतिकारक यंत्रणा जंतूंचा नाश करू शकते. लिंबाची साल आपण किसून कोशिंबीरीत घालू शकतो, भाजी, आमटीत घालू शकतो किंवा सरबतात घालू शकतो.
- ज्येष्ठमध : ज्येष्ठमधामुळे शरीरात साठलेला कफ कमी होतो. सर्दी, खोकला झाला असेल तर तो लवकर आटोक्यात येण्यासाठी ज्येष्ठमध, हळद, लवंग, दालचिनी असा काढा घ्यावा.
काय खाऊ नये?
- कृत्रिम रंग : विकतचे ज्यूस, जॅम, गोळ्या, सॉसेस, शेव, फरसाण यामध्येसुद्धा कृत्रिम रंग असतात. कृत्रिम रंग म्हणजे केमिकल्सचे नुसते मिश्रण असते. या केमिकल्समुळे रोगप्रतिकारक शक्ती क्षीण होते.
- साखर : साखरेमुळे शक्ती मिळते. माणसांना जशी साखरेची गरज असते, तशीच जिवाणू, विषाणू यांनाही साखरेची गरज असते. साखर हे त्यांचं खाद्य असतं. भरपूर साखर मिळाली तर ते वाढतात आणि फोफावतात. यामुळे आहारात जेवढी साखर (refined sugar) जास्त, तेवढी जंतूंची वाढ होण्याची शक्यता जास्त. म्हणून किमान इन्फेक्शन झालेले असताना अतिरिक्त साखर असलेले पदार्थ (चॉकलेट, बिस्किट, आइस क्रीम, जॅम ई.) खाऊ नयेत.
इम्युनिटी वाढवण्यासाठी आहारातील हे बदल नक्की करा.
YouTube Link – https://youtu.be/H65HvOt2AB4
Read More blogs on Parenting Here
Print + Audio
Only Audio
Only Magazines
Magazines
Our Combo Packs
Books By Quests
Curated
Books
Parenting Courses
Expert Talks
Books on Parenting
Parenting
Blogs