लेखक : डॉ. विभुषा जांभेकर
‘शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ’ ही म्हण सगळ्यांनाच माहित आहे. कामाच्या क्षेत्रात, अभ्यासात यश मिळवण्यासाठी आपला मेंदू तल्लख असणं आवश्यक आहे. पण आजच्या धावपळीच्या, फास्ट, तणावपूर्ण जीवनशैलीत आपल्याला पडलेल्या कोणत्याही प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी आपली मुलं लगेच गुगल, इंटरनेटकडे धाव घेतात आणि त्यावरून मिळालेल्या (अनेकवेळा अर्धवट) उत्तरांवर समाधान मानतात. खरं तर एखाद्या प्रश्नाचे उत्तर शोधून काढणे, आपल्यावर कोणतेही संकट आले तर त्यातून बाहेर कसे पडावे, सारासार विचार करून मार्ग कसा काढावा ही क्षमता आपल्या स्वतःमध्ये, आपल्या मेंदूत असते. फक्त आपल्या मेंदूला त्याप्रमाणे ट्रेन करून, ती क्षमता ओळखून तिचा वेळ येईल तेंव्हा वापर करणं आपल्याला जमायला हवं. पण आजकाल सतत वेगवेगळ्या ताण-तणावांशी लढा देण्यात आपला मेंदू थकून जातो. त्याचबरोबर व्यायामाचा अभाव, चुकीच्या खाण्याच्या पद्धती, जीवनसत्वांच्या कमतरता यामुळेसुद्धा ती क्षमता कमी झाली आहे. खरं तर आपल्या रोजच्या आहारात अनेक औषधी गुण आहेत ज्यामुळे मेंदू तल्लख होऊ शकतो. आज आपण अश्याच काही अन्नपदार्थांची माहिती घेऊ.
ओमेगा ३ फॅट्स:
हे फॅट्स मुलांना लहान वयात मिळाले तर त्याने मेंदूच्या पेशींची संख्या वाढायला मदत होते. पण वयाच्या तिसऱ्या वर्षानंतर ती संख्या जास्त वाढत नाही. म्हणून बदाम, अक्रोड, तीळ, गायीचे दूध, जवस हे पदार्थ नियमित मुलांना द्यावे. अपघातामुळे, रक्तस्त्रावामुळे किंवा कोणत्याही कारणांनी मेंदूला इजा झाल्यास त्या वेळी ओमेगा ३ फॅट्स योग्य प्रमाणात मिळाले तर त्यापासून मेंदूचा बचाव होऊ शकतो. मेंदूवर दुष्परिणाम होत नाही.
ओला नारळ:
ओल्या नारळामध्ये चांगल्या प्रतीचे फॅट असतात. लहान मुलांमध्ये वयाच्या ६ वर्षांपर्यंत मेंदूची वाढ होत असते. नारळामधील फॅट हे मेंदूची जडणघडण होण्यासाठी महत्त्वाचे असतात. म्हणूनच मुलांनी रोज ओला नारळ (अर्थातच ‘फ्रेश’, प्रक्रिया न केलेला) खावा.
उच्च दर्जाची प्रथिने :
आपल्या सगळ्या शरीर-क्रियांचा कंट्रोल हा आपल्या मेंदूकडे असतो. भूक लागल्याची जाणीव होणं, अन्नपचन होणं, स्नायूंच्या हालचाली इ. हे साध्य होतं कारण प्रत्येक सेकंदाला आपल्या संपूर्ण शरीराचं आणि मेंदूचं एकमेकांशी सिग्नलिंग चालू असतं. ही संदेशांची देवाण-घेवाण नीट होण्यासाठी उच्च दर्ज्याची प्रथिने आपल्या आहारात असणं आवश्यक आहे. मिश्र डाळींचा वापर, मोडाची कडधान्य, पनीर इ. आहारात असावे.
कोणते पदार्थ खावे याचबरोबर कोणते खाऊ नये हे माहित असणंही आवश्यक आहे.
पांढरी साखर:
साखरेच्या नियमित वापरामुळे मेंदूची क्रिया मंद होऊ लागते. सिग्नलिंग नीट होत नाही. अतिरेकी साखरेच्या सेवनामुळे शरीरात खूप ऍसिडिटी निर्माण होते. या ऍसिडिटीमुळे मेंदूला पुरेश्या प्रमाणात प्राणवायूचा पुरवठा होत नाही. त्यामुळे सतत झोप येणं, मरगळल्यासारखं वाटणं हे त्रास होतात.
मेंदू तल्लख राहावा यासाठी हे आहारातील बदल नक्की करा!
Read More blogs on Parenting Here
Print + Audio
Only Audio
Only Magazines
Magazines
Our Combo Packs
Books By Quests
Curated
Books
Parenting Courses
Expert Talks
Books on Parenting
Parenting
Blogs