- डॉ. लिसा बलसारा (Pediatric Hemato-oncologist & BMT Physician)
शब्दांकन - प्राजक्ता देशपांडे

 

लोह म्हणजेच Iron शरीरासाठी किती आवश्यक आहे हे अनेकदा तुम्ही ऐकलेलं असेल. मुलांच्या वाढीसाठी आणि विकासासाठी ते अत्यंत उपयोगी पोषणमूल्य / nutrient आहे. लाल रक्त पेशींमधलं हिमोग्लोबिन तयार करणं हे याचं मुख्य काम आहे. या आयर्नमुळेच आपल्या फुफ्फुसांमधून ताजं ऑक्सिजन शरीरातील इतर अवयवांपर्यंत पोचवलं जातं.

लोहाची कमतरता म्हणजे काय ? | What Is Iron Deficiency and Anemia?

लोहाची कमतरता किंवा Iron Deficiency ही लहान मुलांच्या संदर्भातली महत्त्वाची समस्या आहे. मुलांच्या शरीरावर Iron च्या कमतरतेमुळे गंभीर स्वरूपाचे परिणाम होऊ शकतात आणि यावर लवकर उपचार घेतले नाहीत तर अनेमियासारखे आजार होऊ शकतात. अनेमियामध्ये लाल रक्तपेशी तयार व्हायला अडथळा निर्माण होऊ शकतो.

दररोज किती लोह आवश्यक आहे? | How Much Iron is Required Per Day?


         - सगळ्यात आधी आपण हे जाणून घेऊ या की दररोज आपल्याला किती प्रमाणात Iron आवश्यक आहे.
         - लहान मुलांपासून ते किशोरवयीन मुलांमध्ये लोहाची आवश्यकता

         - सामान्यतः जन्माच्यावेळी नवजात बालकाच्या शरीरात लोह असलं तरीही जन्माला आल्यावर त्याला त्याच्या रोजच्या आहारातून iron चा पुरवठा झाला पाहिजे. नवजात बालक हे पूर्णतः आईच्या दुधावर अवलंबून असते. जर आईच्या शरीरातच लोह कमी असेल तर अगदी कमी  वयापासून त्या बालकामध्ये लोह अथवा iron ची कमतरता जाणवू शकते.

लोहाची कमतरता कशामुळे होते? | What are the causes of Iron Deficiency?

  • अकाली प्रसूती आणि बाळाचे कमी वजन- वेळेआधी प्रसूती होऊन जन्माला आलेली आणि कमी वजन असलेली बाळे अधिक संवेदनशील असतात.
  • गाईच्या दुधाचे सेवन- एक वर्ष किंवा त्यापेक्षा कमी वय असणाऱ्या बाळांना गाईचे दूध दिल्याने अन्नातून आयर्न शोषून घ्यायला अडथळा निर्माण होऊ शकतो.
  • लहान मुलांचा आहार- लहान मुलांना दुधाव्यतिरिक देण्यात येणारे अन्न लोहयुक्त नसेल तर म्हणजेच आहारात लोहयुक्त पदार्थांचा समावेश नसणे. (यासाठी पेज, सूप लोहयुक्त असावे.) मुलं गरजेपेक्षा अधिक काळासाठी फक्त आईच्या दुधावर अवलंबून असणे त्यामुळे इतर अन्नाचा शरीराला पुरवठा कमी होणे.
  • प्रतिकार शक्तीची कमतरता- सतत आजारी पडणारी मुले आणि त्यामुळे दिल्या जाणाऱ्या मर्यादित आहारामुळे लोहाची कमतरता निर्माण होऊ शकते.
  • लहानमुलांमधील लठ्ठपणा- जास्त वजन असणाऱ्या लहान मुलांमध्ये लोहाची जास्त गरज असते.

मुलांमध्ये लोहाची कमतरता आहे हे कसं ओळखायचं? | Symptoms of Iron Deficiency in Children

 

Iron कमी असेल तर काय उपाय करावे? | How to Prevent Iron Deficiency?

  • लोहयुक्त आहार (Iron rich foods list)- आहारात मांसाहारी पदार्थ, अंडी, मासे, डाळी, तृणधान्ये आणि हिरव्या पालेभाज्या अश्या लोहयुक्त पदार्थांचा समावेश करावा.
  • जीवनसत्व सी / व्हिटॅमिन C- लोहयुक्त पदार्थांसोबत व्हिटॅमिन C असणारे पदार्थ सेवन केल्याने Iron Absorption वाढते.
  • गाईचे दूध- १ ते ५ वयोगटातील मुलांना ५०० ml पेक्षा जास्त गाईचे दूध देऊ नये.
  • supplements-  बालरोगतज्ज्ञाच्या सल्ल्याने लोहयुक्त औषधें किंवा Iron supplements द्यावीत.

नवजात बालकांच्या संदर्भात त्या मुलांच्या आयांनी Iron deficiency बाबत जागरूक असणं फार महत्त्वाचं आहे कारण नवजात बालक आहारासाठी पूर्णतः आईच्या दुधावर अवलंबून असते. इतर किशोरवयीन मुलांच्या बाबतीत पालकांनी मुलांचा आहार जास्तीत जास्त लोहयुक्त असेल याकडे लक्ष देणं जास्त गरजेचं आहे. तरच अनेमियासारखी समस्या उद्भवण्यास आळा बसेल.

मला आशा आहे, ही माहिती आईबाबांसाठी त्यांच्या मुलांमधील लोहाची कमतरता रोखण्यासाठी उपयोगी पडेल. यासंदर्भात कुठलीही शंका असेल तर कमेंट्समध्ये विचारू शकता.

ह्याच विषयावर चिकूपिकूच्या Youtube Channel वर - " मुलांमध्ये Iron ची कमतरता हे कसं ओळखायचं ? | Ft - Dr. Liza Bulsara " च Expert talk नक्की बघा - Watch Here

Read More blogs on Parenting Here