लेखक : ऊर्जा पाटील
सध्याच्या या लॉकडाऊन च्या काळात बऱ्याच आयांना Work from Home करावं लागत आहे. आणि घरी असल्यामुळे, घरची सगळी कामं अंगावर पडल्यामुळे Work for Home तर आहेच !
त्यातून मुलं आणि घरची मंडळी पूर्ण वेळ घरी अशी कोणालाच सवय नाही. आई बाहेर जाऊन काम करणारी असो किंवा गृहिणी असो; प्रत्येकीसाठी हे सगळं वेगळं आहे. पण आपण सर्वांनी हे स्वीकारलं आहे आणि आपापल्या परीने त्याला तोंड देणंही चालू आहे. सध्या अनेक भूमिका बजावत असताना बऱ्याच बायकांचं स्वतःकडे थोडं दुर्लक्ष होतंय. आणि मग शारीरिक, मानसिक कुरबुरी बदलत्या हवामानावर, वातावरणावर ढकलून दिवस लोटले जातात.
या Work from Home आणि Work for Home मुळे महिलांची तारेवरची कसरत होत असेल आणि कदाचित थोडी चिडचिड ही वाढली असेल; म्हणून हे सदर खास तुमच्याकरिता ..
गोष्टी सांगेन युक्तीच्या चार ..!!
- It is OK to be Okay..!! – कामातल्या आणि घरातल्या प्रत्येक गोष्टी आपल्याला जमल्याच पाहिजेत असं काही नाही. नाही दर वेळेस घरतल्या प्रत्येकाच्या आवडीच्या भाज्या बनवता आल्या, इट्स ओके ! नाहीतर नवऱ्याला हेच लागतं, सासुबाईना हे आवडत नाही, मुलगा ही भाजी खातच नाही यामध्ये आपली आवड बाजूलाच राहते. तेव्हा स्वत:ला सांगा ,”इट्स ओके !” नाही आवरला ओटा एखाद्या रात्री .. इट्स ओके ! नाही काढला एखादा दिवस घरातला केर.. इट्स ओके !
- You are Not a Superwomen! – प्रत्येक स्त्री ने हे मान्य करायला शिकलं पाहिजे की आपण कोणी सुपरवुमन नाही आहोत. घर, ऑफिस, मुलं, नवरा सगळ्यांना सगळ्याच वेळी खुश नाही ठेवता येणार. इंस्टाग्राम किंवा फेसबुकवर इतर बायकांनी पोस्ट केलेले खुसखुशीत पदार्थांचे फोटो बघून कॉन्शस व्हायची मुळीच गरज नाही. या उलट आपल्याला ज्या गोष्टी आवडतात त्या करूया. इतरांशी तुलना करण्यापेक्षा स्वतःशी तुलना करूया आणि सकारात्मक राहूया.
- Ask for help! – मदत मागण्यात अजिबातच कमीपणा नाही. घरातले बाकीचे लोक जर स्व:हून मदत करत असतील तर छानच. पण जर करत नसतील तर “मी घरात एवढी राब राब राबते, ह्यांना बघा आहे का त्याचं काही ? लग्नाला इतकी वर्षं झाली कळलं पाहिजे न स्वत:हून ..??!!!” असे विचार करण्यात काय पॉइंट आहे. त्यापेक्षा अगदी सहज बोलल्याप्रमाणे सांगा एखादे काम, काय हरकत आहे ! मुलगा किंवा मुलगी जरा 8-10 वर्षांचे असतील तर रोजचे एखादे काम त्यांना करायला लावा उदा. कपडे वाळत घालणे, वाळलेल्या कपड्यांच्या घड्या करणे, फर्निचर पुसणे, झाडांना पाणी घालणं.
- स्वतःला वेळ द्या ! – दिवसातून किमान२० मिनिटे तर नक्कीच. या वेळेत बरेच काही स्वत:साठी करता येण्यासारखेआ हे. उदा. योग आणि प्राणायाम करणे, वाचन करणे , बागकाम करणे, लहानपणीचा एखादा छंद (की ज्याचा सध्या विसर पडलाय) जोपासणे , शाही स्नान करणे , गाणी म्हणणे, जुने फोटो अल्बम पाहणे , संगीत ऐकणे, वगैरे.
सध्याचा हा वेळ कुटुंबीयांबरोबरच स्वतःसोबतही मजेत घालवण्याचा प्रयत्न करूया. लॉकडाऊन च्या काळातले काही चांगले क्षण तयार करूया.
स्वत:ला आणि कुटुंबाला जपा, काळजी घ्या !!
Read More blogs on Parenting Here
Print + Audio
Only Audio
Only Magazines
Magazines
Our Combo Packs
Books By Quests
Curated
Books
Parenting Courses
Expert Talks
Books on Parenting
Parenting
Blogs