लेखक : सौ. गौरी तारे -कित्तूर
स्पर्धा.. मुलांसाठी की पालकांसाठी?
15 एप्रिलला ‘World art day’ होता. छोट्या माणसाच्या शाळेत चित्रकलेची स्पर्धा होती. लहान वर्गांना विषय होता निसर्ग आणि याच्या वर्गाला विषय होता काल्पनिक. आता याला वाटलं, काल्पनिक म्हणजे अस्तित्त्वात नसलेले. मी विचारलं, “काय काढणार आहेस सांग मला मग आपण जरा प्रॅक्टिस करू.” म्हणाला “Don’t worry ममा डोक्यात सगळं सेट आहे! तिथे डायरेक्ट काढीन!”
“अरे वाह! छान झालं तू ठरवलंस स्वतः. पण माझ्याशी शेअर करशील का, कदाचित मी तुला अजून मदत करू शकेन. एकदा तरी काढून दाखव बॉ मला.”
खूप विचार करून म्हणाला, “मी मांजरीचं डोकं, त्याला माश्याची बॉडी अणि डायनॉसोरचे पाय असं काढायचं ठरवलं आहे.” ढॅणतडॅन!!
ते सगळं काही बरं दिसेना. चित्र पाहून स्वतः घाबरला😆
मग आपला साधासुधा डायनॉसोर, सूर्य, मागे पहाड, झाडं वगैरे असं सगळं ठरलं.
स्पर्धा झाली. घरी आला. म्हंटलं “काय मग जमलं का? “ छोटा माणूस म्हणाला “हो! एकदम first class. मला खूप मज्जा आली.
“नंबर बिंबर येईल का रे?”
“ममा मला जमलं तसं मी काढलं. माझ्या मैत्रिणीनी इतकं सुंदर काढलं. तिचाच येईल बघ नंबर.
“ मी म्हंटलं “दुसऱ्यांना इतकं encourage करतोस, स्वतः जरा जास्त प्रयत्न केलास तर तुझा पण येईल नंबर.”
मला म्हणतो, “ममा मला सांग नंबर येऊन काय होईल?
“ मी म्हटलं, “मस्त वाटेल तुला!!”
“ते तर मला आत्ता पण वाटतंय.
“ नेहमीप्रमाणे माझ्याकडे या लॉजिकसमोर काहीच उत्तर नव्हतं! आता जसजसं याचं वय वाढणार आहे, तसा शाळेचा अभ्यास, स्पर्धा, वेग सगळंच वाढेल.
मी खूप विचार केला. याला पटेल अश्या लॉजिकनी कसं सांगू की स्पर्धा म्हणजे काय?
आपण जिंकायचा कसा प्रयत्न केला पाहिजे आणि परत हे पण शिकवायचं की नंबर नाही आला तरी चालतो, भाग घेण्याचं स्पिरीट महत्त्वाचं!
This is so complicated to understand even for adults.😑
याच्या वर्गातल्या प्रत्येक गोष्टीत कायम पहिल्या येणाऱ्या मुलाला अणि त्याचा सतत पहिला नंबर कसा येईल, पेपरमध्ये नाव कसं येईल, अजून स्पर्धांची माहिती कशी मिळेल याची धडपड करणाऱ्या आया पाहिल्या की वाटतं आपण काहीच नाही करत यार. खूप लाइटली घेतोय का हे सगळं?
पण नंतर वाटतं ही धडपड पालकांनी करायला हवी की मुलांनी? आणि ती खरंच गरजेची असते का? सगळीकडे नंबर यावा ही नक्की मुलांची इच्छा असते का पालकांची?
काही लिमिटपर्यंत मुलांना प्रोत्साहन देणं, ढकलणं गरजेचं आहेच. कारण त्यांना या वयात माहितीच नसतं आपण काय काय करू शकतो ते. त्यांना सगळं उपलब्ध करून देणं हे पालकांचं काम नक्कीच आहे.
स्पर्धा असली की ती आपण जिंकण्याचा प्रयत्न करतो, आपले सगळे प्रयत्न पणाला लावतो. यातून आत्मविश्वास मिळतो की अरे वाह हे मला येतंय. शिस्त लागते. स्पर्धेचे फायदे खूप आहेत जर ते योग्य प्रकारे समजले तर. पण सतत तेच वातावरण असलं की मग सुरू होते तुलना, ईर्षा, अपयश पचवू न शकणं.
Competition is a tricky thing I feel.
माझ्या लहानपणी मी खूप स्पर्धांमध्ये भाग घ्यायचे. चित्रकला, हस्ताक्षर, गाणी, पेटी वादन, वक्तृत्व, नाच, निबंध. तेव्हा स्पर्धा म्हणजे खरंच स्पर्धा असायची. सगळ्यांना सर्टिफिकेट वगैरे असे लाड नसायचे. कधी नंबर यायचा, कधी नाही. पण त्यामुळे माझी आवड नेमकी कशात आहे हे समजलं आणि काय अजिबात जमत नाही तेही कळलं
मुख्य म्हणजे आई वडिल छडी घेऊन मागे कधी लागले नाहीत की असा कसा नंबर आला नाही. त्यामुळेच त्या सगळ्यात एक मजा होती. प्रेशर नव्हतं नं!
मग माझ्या मुलांसाठी स्पर्धेविषयी माझा दृष्टिकोन कसा असला पाहिजे? वाटलं ज्याने हा विचार करायला भाग पाडलं त्यालाच विचारावं. खेळता खेळता छोट्या माणसाला विचारलं, “तुला काय वाटतं रे स्पर्धांबद्दल. त्यांच्याविषयी एक चांगली आणि एक वाईट गोष्ट सांग. “ लगेच म्हणाला, “It is good if I win. It is bad if I lose. But mostly it is good because I get better at things.” इतक सोप्पं आहे बघा. मी उगाच विचार करत बसले!
या सगळ्याच्या पलीकडे जाऊन छोटा माणूस म्हणाला त्याप्रमाणे ‘एन्जॉय करणं’ हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं नैका? 😁 Being a better version of ourselves is and should be the underlying message here. हो नं ?
Gauri Tare Kittur
#withpinchofsugar
Read More blogs on Parenting Here