लेखक :  गौरी कित्तूर


घर दोघांचंही

परवा आंघोळ करताना माझ्या मुलाने म्हणजे छोट्या माणसाने बाथरूममध्ये मस्त पसारा मांडला. प्लास्टिकचे बदक, साबणाचा फेस, बादल्या उलट्या पालट्या. सोबत जोरजोरात गाणी. नवऱ्याने म्हणजे मोठ्या माणसाने जरा आत डोकावून पाहिलं आणि म्हणाला मस्ती झाली की आवरून ठेव रे सगळं. साबण काही निघेना. मग मोठ्या माणसाने ब्रशने स्वच्छता करायला सुरुवात केली आणि म्हणाला “बाथरूमच घासून काढतो आता.” तेवढयात छोटा माणूस म्हणतो, “बाबा हे तर मम्माचं काम आहे. आपलं नाही.”

माझ्या अतितीक्ष्ण कानांना हे वाक्य किचनमध्ये सुद्धा बोचलं.

मी त्याला सांगायला आलेच तेवढ्यात मोठा माणूस म्हणाला, “घर आपलं, काम आपलं. हे काम ह्याचं, ते काम त्याचं असं काही नसतं रे. ज्याला जमेल, वेळ असेल, त्याने ते करायचं.

“ज्याने केलं त्याला thank you म्हणायचं.”

मी शांतपणे त्यांचं बोलणं ऐकत होते.

पुढे मोठा माणूस म्हणाला, “कधीकधी संध्याकाळी तुला मस्त टमटम पोळी कोण करून देतं? आणि कुरूमकुरूम डोसे कोण बनवतं? (जे माझे तुझ्या आईपेक्षा छान कुरकुरीत होतात असा टोन आला माझ्या लक्षात पण आम्ही यावेळी एका टीममध्ये आहोत म्हणून सोडलं) मी देतो है न? तुला आवडतात ना? कधीकधी ममा तुला बाहेर फिरायला नेते. सामान आणते, जड गोष्टी ढकलते, सिलेंडर पण लावते. खूप वर ठेवलेल्या गोष्टी फक्त तिला काही काढता येत नाहीत.” दोघंही फिदीफिदी हसायला लागले.

So असं काही नसतं कळलं? कुणी कुठलंही काम करू शकतं. आलं का लक्षात? आता आटप चल.” मोठ्या माणसाने चांगला गड लढवला.

Gender equality हा फार मोठा विषय आहे. पण त्याची सुरुवात आपल्या घरातच व्हायला हवी. बायकांची जागा स्वयंपाकघरातच असते, अशा विचारांची मला मनापासून चिड येते. मग याच घरातली मुलं पुढे अशीच वागत राहतात. बायका सहन करत राहतात. Vicious circle आहे हे. हे निदान आपल्या पिढीने तरी तोडायलाच हवं.

बाईला आणि पुरुषाला घरातल्या आणि बाहेरच्या बेसिक गोष्टी या यायलाच हव्या. त्यात काही फार मोठेपणा किंवा छोटेपणा नाही. Its just basic necessity isn’t it?

माझ्या बहिणीला एकदा एक मुलगा पाहायला आला होता. लंडनच्या भारीतल्या एका University मधून डिग्री वगैरे घेतलेला. माझी बहीण नोकरी करणारी. लंडनमध्ये एकटी राहणारी. तिने अपेक्षा सांगितल्या मला 50-50 partner हवाय. घर office जसं मी सांभाळते तसाच. तो म्हणाला मला घरातलं काहीच येत नाही. माझी आई मला पाण्याचा ग्लाससुद्धा उचलू देत नाही. माझी बहीण म्हणाली मग तुझ्या डिग्रीचा काय उपयोग जर तुला बेसिकच येत नाही. अर्थातच ते लग्न जमलं नाही.

Thank goodness!

खूप बायका भ्रमात असतात की माझ्याशिवाय घर चालूच शकत नाही. मी बाहेर गेले तर मुलं जेवत नाहीत, नवरा स्वतःच्या हाताने वाढून घेत नाही, घरातले मोठे स्वतः स्वतःचे औषध हातात दिल्याशिवाय घेत नाहीत. हे सांगताना फार अभिमान असतो. पण तुम्ही तुमच्या प्रेमापोटी कुणाला तरी पांगळं करताय हे त्यांच्या लक्षात येत नाही?

यात चूक दोन्हीकडून आहे. काळजी, प्रेम असं म्हणत घरातल्या बायका लाडवतात घरच्यांना आणि घरचेसुद्धा यात आपणहून बदल करत नाहीत. Sorry but not Sorry. I’m being very straight forward here.

सगळ्यांना स्वतंत्र होऊ द्या नं. काही कुटुंबांना लगेच जमेल, काही कुटुंबांना वेळ लागेल. We have to take baby steps somewhere. तरच हे काम हिचं आणि ते काम त्याचं हे दुष्टचक्र नक्की तुटेल आणि कुटुंबातली प्रत्येक व्यक्ती सगळ्या कामात माहीर होईल.

That is the ultimate goal right?

As a community, we have definitely started to raise our daughters like our sons. But only a few have the courage to raise their sons like daughters.

Let that sink in.

Read More blogs on Parenting Here