Netflixच्या Adolescence मालिकेमधून पालकांनी काय शिकावे?

लेखक :  संहिता सहस्रबुद्धे

पाहिल्यानंतर अनेक दिवस अस्वस्थ करणारी आणि आजच्या पालकांसाठी डोळे उघडायला लावणारी मालिका म्हणजे Netflix वरील "Adolescence" ही सिरीज. आजची किशोरवयीन मुलं मानसिक ताण, Screen चे व्यसन, Peer Pressure यात वेढलेली आढळतात. यामुळे होणाऱ्या भावनिक दुर्लक्षाचे काय दुष्परिणाम होऊ शकतात याची एक भेदक झलक ही मालिका दाखवते. 

किशोरावस्थेत मुलं कशी वागतात त्याचा पाया लहान वयातच रोवलेला असतो. पालक म्हणून आपण मुलांशी कसे वागतो, त्यांना कसे वाढवतोय, काय Exposure देतोय ह्या सगळ्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत. त्यामुळेच आपण वेळेत पाऊलं उचलली तर मुलांचे मानसिक ताण, भावनिक गुंतागुंत, अडचणी नक्कीच टाळता येऊ शकतील.

ह्या मालिकेतुन पालकांनी काय शिकवण घ्यावी?

१. मुलांशी ‘connection’ साधा

मुलांच्या आयुष्यात खऱ्याअर्थाने उपस्थित राहू या! आपण त्यांच्याशी बोलतोय पण लक्ष स्क्रीन वरच आहे, तर त्यांच्याशी आपल्याला एक छान, अगदी कनेक्टेड असं नातं कसं घडवता येईल? मुलांना वेळच्या वेळी पाहिजे ते गिफ्ट / वस्तू दिली की पालक म्हणून आपली जबाबदारी संपत नाही. 

मुलांसाठी सगळ्यात जास्त महत्वाचं असतं ते त्यांच्या भावनिक गरजा पुरवणं. त्यांना गरज असेल तेव्हा संपूर्णपणे त्यांच्यासाठी उपस्थित असणं. आणि लहान वयात हे साध्य नाही झालं तर किशोर वयात तर मुलं अजूनच दुरावू शकतील. जर पालक सतत डिव्हाइसेसमध्ये गुंतले असतील, तर मुलंही तोच मार्ग अवलंबतील, नाही का?

आपण काय करू शकतो : मुलांना आपला १००% वेळ द्या, भले तो थोडाच का असेना. पण तो वेळ पूर्णपणे त्यांचा असावा. १००% लक्ष देऊन, मुलांशी संवाद साधा. मुलांचे भावविश्व् आवडीनिवडी, मित्र-मैत्रिणी, जाणून घेऊ या.

२. व्यक्त होण्यासाठी Safe Space द्या

तुमचं मूल त्याच्या भावना मोकळेपणाने सांगू शकतं का? तुमच्याशी काहीही बोलायला सुरक्षित वाटतं का? हे तपासून बघा. आपण वाढलो तेव्हाच्या आणि आत्ताच्या काळामध्ये आणि परिस्थिती मध्ये खूप बदल घडला आहे. त्यामुळे मुलं आपल्याशी काही share करत असताना लगेच आपली मतं सांगून / decision घेऊन टाकू नका. गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करु या, विचार आणि Possibilities open ठेवू या, त्यांच्या भावनांची कदर करु या - especially जेव्हा मुलं आपल्याशी बोलायचा option निवडतात. याबाबत त्यांच्या मनात विश्वास निर्माण करण्याची जबाबदारी आपलीच आहे.

आपण काय करू शकतो: वारंवार मुलांच्या आयुष्यात काय चालू आहे हे जाणून घेऊ या. त्यांना बोलायला प्रोत्साहन देऊ या. त्यांच्या भावनांची दखल घेऊ या. "तुला कधीही काही सांगावसं वाटलं तर, मी आहे." Feelings-first हा नियम ठेवू या.

३. त्यांना बोअर होऊ द्या (हो, खरंच!)

सततच्या माहितीमुळे, over consumption, over stimulation मुळे आपला मेंदू थकून जातो. आणि मग काही creative करायला, सुचायला जागाच उरत नाही. खरं म्हणजे कंटाळा ही काही वाईट गोष्ट नाही. सर्जनशीलतेचा जन्म कंटाळ्यातूनच होतो. ज्या मुलांना वेळ घालवण्यासाठी सतत काहीतरी दिलं जात नाही, ते स्वतः खेळ तयार करतात, छंद जोपासतात, आणि संयम शिकतात.

आपण काय करू शकतो: मुलांना सतत कशाततरी गुंतवून ठेवू नका. आता काय करु, पुढे काय करु हे सांगण्यापेक्षा त्यांचं त्यांना ठरवायची संधी द्या. त्यांचं मनोरंजन करणं आपली जबाबदारी नाही, त्यांना थोडं बोर सुद्धा होऊ द्या.

४. स्क्रीन-फ्री सवयी लावा

आत्ताच्या Screens आणि Social Media च्या जगात पालकांवर अजूनच जास्त जबाबदारी आहे ती मुलांवर वाईट गोष्टींचा प्रभाव पडू नये याची. Internet क्रांती मुळे Information access तर वाढला, पण काय चांगलं आणि काय वाईट याची जाणीव कशी वाढवणार? ही समज कुठलं तंत्रज्ञान नाही देऊ शकत, हे पालकांनाच मुलांमध्ये रुजवावे लागते. स्क्रीनची शिस्त मुलांमध्ये लावू या. ही छोटीशी पण महत्त्वाची शिस्त मुलांना वास्तवाशी जोडून ठेवते.

आपण काय करू शकतो : रोज ठराविक वेळ पूर्णपणे स्क्रीन फ्री ठेवू या. हा वेळ Family bonding साठी ठेवू शकतो.

  • जेवणाच्या वेळी डिव्हाइसेस बाजूला ठेवणे

  • झोपण्याआधी पुस्तक वाचणे, संवाद साधणे.

  • योग्य वयाचे होईपर्यंत मुलांना social media वापरू देऊ नका.

५. मुलं बघतील तेच करतील

तुम्ही तुमच्या मोकळ्या वेळात काय करता? जर पालक स्वतःच स्क्रीनमध्ये हरवलेले असतील तर मुलांमध्ये सुद्धा हीच सवय रुजेल. पालकांची स्क्रीनची सवय मुलांमध्ये पण एकटं राहण्याचा कल वाढवते. मुलं अनुकरण प्रिय असतात. जे बघतात तेच करतात. तुम्हाला मुलांनी वाचन करावं असं वाटतंय? तर तुम्ही सुद्धा वाचायाला हवं. त्यांना मैदानी खेळ खेळावा असं वाटतंय? तर तुम्ही सुद्धा खेळायला हवं. मोकळ्या वेळात तुम्हीही मुलांसोबत काहीतरी नवीन शिकू शकता, बागकाम करु शकता, चित्र काढू शकता, काहीतरी नवीन शिकू शकता.

आपण काय करू शकतो: Do as I say ऐवजी Follow what I do ही पद्धत स्वीकारा. स्क्रीनच्या बाहेरचं जग अनुभवायची भरपूर संधी त्यांना देऊ या.

 

Read More blogs on Parenting Here