‘अरे बापरे सुट्टी’ पासून ‘वाह भारी सुट्टी’ सुट्टीचा प्लॅन करा हटके, 25 Summer Vacation Ideas

लेखक :  संहिता सहस्रबुद्धे

आज वेदच्या शाळेत report day होता. त्याची वर्षभराची प्रगती बघून आई बाबा जाम खुश होते. “अभ्यासात पण छान आहे मुलगा, फक्त दंगा जास्ती घालतो. सुट्टीत जमलं तर थोडा सराव करुन घ्या. शाळा आता परत जूनमध्ये सुरु होईल.” Teacher म्हणाल्या आणि आईला धस्सच झालं. ‘म्हणजे उद्यापासून हा मुलगा दिवसभर घरी? कामं कशी होणार? आपण लहान होतो तेव्हा उन्हाळ्याची सुट्टी किती exciting वाटायची. पण मग आता आपले roles बदलल्यावर - म्हणजे पालक म्हणून आपल्याला ह्याच उन्हाळ्याच्या सुट्टीचा एवढा लोड का बरं येतो?’ आई विचारात पडली. आईच्या चेहऱ्यावर चिंता सरळ दिसत होती.

बाबा ओळखून हसले आणि म्हणाले “अगं! एवढं काय! आठवतंय का आपण काय धमाल करायचो उन्हाळ्याच्या सुट्टीत? भावंडांबरोबर नुसता दंगा घालायचो! मोकळ्या मैदानात तासंतास खेळायचो, झाडावर चढायचो आणि भरपूर आंबे खायचो! वेळेचं भानही नसायचं आपल्याला. त्या उन्हाळ्याच्या सुट्टीकडे डोळे लावून तर आख्खं वर्ष काढायचो! आता हीच मज्जा करायची त्याची पाळी आहे! कामं होत राहतील, आपण करू सगळं manage.”

आईला बाबांचे हे शब्द ऐकून थोडा धीर आला. आपण काय काय करु शकतो ह्याची बाबांनी घरी येऊन लिस्टच बनवली. काय होतं बरं ह्या लिस्ट मध्ये? 
ही cheat sheet खास चिकूपिकूसाठी इकडे share करतोय.

 1. सुट्टीत मुलांसोबत काय Activities करु शकतो

  • खेळ खेळू

    मुलांना भरपूर खेळू द्या. पोटभर. थकेपर्यंत. असा बिनधास्त वेळ परत येतो का? मुलांसोबत रोज किमान थोडा तरी वेळ प्रत्यक्ष खेळ खेळू. हल्लीचे Formal खेळ म्हणजे क्रिकेट, badminton, फुटबॉल सोडून वेगळे म्हणजे आपल्या वेळचे खेळ मुलांना शिकवू. डबडा ऐस पैस, दगड का माती, टिपरी पाणी, शिरा पुरी असे जुने खेळ त्यांना introduce करुन देऊया. शिवाय भेंड्या, कोडी, फुली गोळा, नाव-गाव-फळ-फूल, आठ चल्लस वगैरे सोपे खेळ सुद्धा आहेत. आणि बाहेर ऊन असलं की घरी बसून खेळायला बोर्ड गेम्स आहेतच. कॅऱम, साप-शिडी, पत्ते, बुद्धिबळ जिंदाबाद. 

  • बागकाम

    मुलांना बागकाम करायला शिकवूया. झाडांना पाणी घालणं, एखादं झाड लावून, रुजवायला शिकवू. झाडाची मशागत कशी करावी, कोणाला पाणी जास्त लागतं, कोणाला ऊन जास्त ह्याची आपण माहिती करून मुलांना सांगू. Bird Feeder बनवून बागेत लावू. 

  • गोष्टी, पुस्तकं वाचन / Book Club सुरु करू या

    मुलांना भरपूर वाचन करायला प्रोत्साहन देऊ. रोजचा पेपर वाचणे, घरी आलेली Pamphlet, जुनी पुस्तकं, लायब्ररी असेल तिथून आणून नवीन पुस्तकं वगैरे. मित्र मैत्रिणींमध्ये एकमेकांची पुस्तकं Exchange करू. मुलांना वाचनाची गोडी लावायला चिकूपिकूचे अंक तर आहेतच शिवाय चिकूपिकू च्या website वर वयाप्रमाणे आवडतील अशी भरपूर पुस्तकं सुद्धा आहेत.सोसायटीमधल्या मुलांना घेऊन बुक क्लब सुद्धा सुरु करू शकतो. आठवड्यातून एक दिवस भेटून कुठलं नवीन पुस्तक वाचलं किंवा गोष्ट ऐकली/ वाचली त्याबद्दल चर्चा करू.

  • Picnic

    एखाद्या रविवारी किंवा सुट्टीच्या दिवशी जवळच्या बागेत किंवा अगदी स्वतःच्या अंगणात आपण बॅग भरून मस्त Picnic ला जाऊ. भेळ, सँडविच, सरबत असे सोपे पदार्थ बनवायला मुलांची मदत घेऊ. सतरंज्या-चटया, खेळायला वेगवेगळे गेम्स अशी सगळी तयारी करायला मुलांना मज्जा येईल.

  • उन्हाळी शिबिरं

    मुलांच्या आवडी जोपासायला किंवा आवडी शोधायला उन्हाळी शिबिरं एक मस्त माध्यम आहे. नाटक, चित्रकला, भाषा, मैदानी खेळ किंवा थोड्या मोठ्या मुलांसाठी ट्रेकिंग/कॅंपिंग असे भरपूर पर्याय हल्ली सापडतात.

  • डबा पार्टी / Pot-Luck

    मित्रमंडळी मिळून एक दिवस एकत्र जेवण करू. प्रत्येक जण एक पदार्थ सर्वांसाठी घेऊन येईल. एकमेकांना नवीन चवी / recipes/ पद्धती कळतील.

  • Movies - बालचित्रपट

    चांगले बालचित्रपट एकत्र बघू शकतो. Baby’s Day Out, Home Alone, Masoom, Hum Hai Raahi Pyar ke असे अजून कुठले चित्रपट आठवतायत का?

  • रात्री चांदण्यात गच्चीवर झोप

    सध्याचं सगळ्यात महाग सुख म्हणजे गच्चीवर किंवा अंगणात, स्वच्छ आभाळाखाली, चांदण्यात झोपणे. घरात उकडत असलं तरी हलक्या येणाऱ्या गार वाऱ्याच्या झुळकेची मजाच वेगळी. आहे का खोलीतल्या A/C मध्ये एवढी ताकद?

2. घरकामात मुलांची कशी मदत घ्याल

  • Everyday Heroes

    लहान मुलांमधली अफाट एनर्जी आपल्याला चांगल्या कामासाठी channelise करता अली तर बेश्टच की! मुलांना रोजची छोटी छोटी कामं सोपवू या. भाजी निवडणे, डबे भरून देणे, कपडे वाळत घालणे, कपडे घडी घालणं वगैरे. कामं केली, छान केली की शाबासकी देऊ.

  • Kids Deep Clean Championship

    थोड्या मोठ्या मुलांना आपण बारकाईने साफ करायच्या छोट्या गोष्टी करायला एक दिवस नेमू या. म्हणजे सोफा, खिडक्या, पंखे, माळे इत्यादी. पण त्यात थोडा fun element असेल तरच मजा ना? मग त्यांना छान apron देऊ, त्यांच्या नावाचा badge बनवू आणि सगळ्यात शेवटी Medals सुद्धा देऊ.

3. मुलांना कुठे फिरायला नेऊ शकतो

  • Be a tourist in your own city

    बऱ्याचदा आपण आपल्या शहरात राहत असलो तरी किती तरी जागा आपण पाहिलेल्याच नसतात. किल्ले, मंदिर, नदी, ऐतिहासिक ठिकाणं, संग्रहालये अशी अनेक ठिकाणं नव्याने मुलांसोबत अनुभवू.

  • Zoo visit

    मुलांना घेऊन प्राणी संग्रहालयाला प्राणी बघायला घेऊन जाऊ. एरवी पुस्तकात असलेले प्राणी प्रत्यक्ष बघायला मुलांना मजा येईल.

  • मंडई visit

    मुख्य मंडई किंवा अगदी घराजवळच आठवडी बाजाराला मुलांना घेऊन जाऊ. त्यांच्या आवडीची एक भाजी आणि नावडीची एक भाजी असं करत खरेदी करू. मुलांना व्यवहार ज्ञान कळायला छान exposure मिळेल.

  • Garden / Park visit

    जवळच्या पार्क/ गार्डन मध्ये तर जायलाच हवं. तिकडे फुगे, भिरभिरं, पतंग खेळूया. भेळ वाल्याकडून भेळ घेऊ. पेरू, कैरी, काकडी खाऊ.

  • Public Transport / वेगवेगळ्या वाहनाने प्रवास

    मुलांना आवर्जून बस / मेट्रो / रिक्षा / टांगा / बैलगाडी अशा रोज वापरात नसलेल्या वाहनातून सैर करवून आणू. कुठंतरी जाण्यात जशी मजा असते तशी कशातून जातोय ह्यात सुद्धा मजा असते.

4. मुलं स्वत:चे स्वत: काय करू शकतील

  • चित्रकला आणि रंगकाम / Drawing and Coloring

    काहीही सूचना न करता, मुलांना हवं तसं, वेडंवाकडं, कसंही, मनासारखं चित्र काढूदे आणि रंगवूदे.

  • पुस्तक / गोष्ट वाचन

    वाचता येत असेल तर कुवतीप्रमाणे भरपूर वाचनासाठी प्रोत्साहन करू, वाचता येत नसेल तर चित्रवाचन, पुस्तक समोर ठेवून गप्पा मारू.

  • Audio Stories

    ऑडिओ स्वरूपात भरपूर गोष्टी उपलब्ध आहेत, त्या मुलांना जरूर ऐकवू. चिकूपिकूच्या जम्मत गोष्टी ह्या अँप वर तर गोष्टींचा खजिना आहे.

  • DIY Activities

    कातरकाम (Cutting-Pasting) , मातीकाम (Clay), कोडी सोडवणे वगैरे मध्ये मुलं छान रमतात.

  • Origami

    विमानं, होडी, टोपी, टीपी-टीपी-टीप-टॉप अशा अनेक विविध गोष्टी बनवून मुलं रमतात.

  • खेळ

    मुलांना काय खेळायच हे त्यांचे त्यांनाच ठरवू दे. स्वत:चे नियम बनवू दे. कंटाळा आला की नवीन काय करायचं हे त्यांना स्वतःलाच सुचू द्या.

  • नाटक / Dance बसवणं

    काही हुरूपी मुलांना घेऊन सोसायटी/ कॉलनी मध्ये नाटक / डान्स बसवू शकतात. सुट्टी संपायच्या आधी एक दिवस ठरवून त्याचं सादरीकरण ठेवू.

  • सायकल राईड

    मुलं बिल्डींग खाली किंवा गल्ली मध्ये आपापली सायकल खेळू शकतील.

  • शुद्धलेखन / वयानुसार थोडा अभ्यास / सराव

    All खेळ and no अभ्यास असं नको असेल तर जरा मुलांना जरा सराव / पाढे म्हणणे / एक पान शुद्धलेखन अशा गोष्टी करायला सांगू शकतो.

लिस्ट तर भारीच होती. ह्यातल्या सगळ्याच गोष्टी अगदी सोप्या आणि करण्यासारख्या होत्या. आईला एकदम उत्साह आला. ती बाबांना म्हणाली “वाह! मला माझेच लहानपणीचे दिवस आठवले. खरंच! उन्हाळ्याची सुट्टी ही तर आपल्याला मुलांसोबत कनेक्ट व्हायला खूप छान संधी आहे. एरवी वर्षभर packed schedule, अभ्यास होमवर्क मुळे जमत नाही ते आत्ता करू शकतो. करुदे मुलांना मज्जा मस्ती धमाल. कारण असा बिनधास्त वेळ परत कुठे मिळतो? नाही का?”

(टीप: ह्या लिस्ट मध्ये Screentime आवर्जून टाळला आहे. तो सगळ्यात सोपा पर्याय आहेच पण आपलं बालपण समृद्ध होतं तसंच आपण आपल्या मुलांना द्यायचा प्रयत्न करू. चिकूपिकू आहेच सोबत!

www.chikupiku.com ला भेट द्या.)