लेखक : सौ. गौरी तारे -कित्तूर
लहानपणापासून मला प्राण्यांची खूप आवड. कुत्रा, मांजर, कासव, मासे, पक्षी अगदी वासरूसुद्धा मी पाळलेलं आहे. त्यामुळे कुत्रा घरात हवाच किंवा असतोच असं मला वाटायचं.
2011 मध्ये मोठ्या माणसाशी (आमचे अहो) लग्न होऊन मी अमेरीकेत रहायला गेले. तिथे ही उणीव फारच जाणवायला लागली. प्राण्यांचं प्रेम हे फारच वेगळं असतं. अगदी मनापासून काहीही अपेक्षा न ठेवता केलेलं प्रेम. Purest form of love म्हटलं तरी चालेल. एकदा कामाच्या निमित्ताने आम्ही दोघं इस्राएलला एक महिना रहायला गेलो. आमच्या घरासमोर निळाशार समुद्र होता. मी रोज सकाळी तिथे जाऊन बसायचे. तिथे माझी दोस्ती एका वयस्क कुत्र्याशी झाली. तो रोज माझ्याशेजारी येऊन बसायचा. मी त्याच्यासाठी काहीतरी खायला घेऊन जायचे. काहीही न बोलता आम्ही दोघं तासंतास समुद्राकडे बघत बसायचो. इतकं बेस्ट फीलिंग होतं नं. ती जी सतत पोकळी मला जाणवत होती ती भरून निघण्याची जाणीव होती त्यात. बस्स! मी तिथेच ठरवून टाकलं. अमेरीकेत गेल्यावर पहिल्यांदा कुत्रा दत्तक घ्यायचा म्हणजे घ्यायचाच.
अमेरिकेत dog adoption च्या खूपच फॉर्मालिटीज असतात. खूप सारे नकार पचवून शेवटी आम्हाला एक कुटुंब मिळालं, ज्यांचा breeding हा व्यवसाय नव्हता. 10 गोल्डन रिट्रीव्हर जातीच्या पिल्लांमधून एक पिल्लू निवडायचं म्हणजे काय गंमत ना ?! तर एक गुबदुल गुबगुबीत पिल्लू सारखं माझ्या मागेमागे येत होतं. त्याला मी खूप आवडले अणि मला तो. लगेच ठरवलं, ह्यालाच नेऊयात घरी. मोठ्या माणसासाठी हे सगळं फार नवीन होतं, त्यालाही गंमत वाटत होती. पिल्लाचं नाव आम्ही “जोई” असं ठेवलं. निघताना त्याच्या आईने मला त्याचं एक खेळणं आणून दिलं, जसं काही तिला कळलं होतं. मी पण तिला न बोलता ‘जोईला अगदी मनापासून जपीन’ असं प्रॉमिस दिलं.
जोई घरी आला आणि आमचं घर एका वेगळ्याचं ऊर्जेनं भरून गेलं. सगळे प्रोग्राम त्याच्या हिशोबाने व्हायला लागले. सारखी आवड असलेल्या लोकांमध्ये आम्ही जास्त रमू लागलो. रोजची दिनचर्या खूप वेगवान झाली. आता आळस करत बसायला आमच्याकडे वेळच नव्हता. त्याला बेसिक शिस्त लावायला त्याला एका Dog Discipline School मध्ये टाकलं. एक महिन्याचा कोर्स बरं का ! हा अतिशय मस्तीखोर जोई तिथे गेल्यावर अगदी शहाण्या मुलासारखं वागायचा अणि घरी आला की परत मस्ती मोड ऑन. हळूहळू जोईला पूर्ण मराठी समजायला लागलं.आंघोळ म्हटलं की साहेब बेडच्या खाली आत घुसून बसणार.
पुढे आमच्या घरी छोट्या माणसाचं म्हणजे माझ्या मुलाचं आगमन झालं तेंव्हा जोई मोठा दादा झाला. एक प्रकारचा शांतपणा त्याच्यात आला. छोट्या माणसाशी म्हणजे माझ्या मुलाशी इतका छान खेळायचा. छोट्या माणसाला जोईनीच रांगायला शिकवलं. आम्ही त्याला संत जोई म्हणू लागलो. आता संत जोई ठकूबाईच्या म्हणजे माझ्या लहान मुलीच्या मागेमागे तिनी टाकलेले घास गोळा करत फिरत असतो. चालता फिरता व्हॅक्युम क्लिनर असं त्याचं नाव पडलंय.
जी लहान मुलं प्राण्यांसोबत मोठी होतात, ती जास्त संवेदनशील असतात असं मला वाटतं. आमच्याकडे आईसक्रीम कधी आणलं की छोटा माणूस आठवणीने जोईसाठी एक कप आणतो. कुठे बाहेर जाणार असू तर पहिले विचारतो, “तिथे जोई चालेल ना, नाहीतर आपण नाही जायचं.” कुणी घरी आलं की छोटा माणूस अणि ठकूबाई सगळ्यांना सांगतात, हा आमचा दादा आहे. मला खूप गोड वाटतं हे. प्राणी असला तरी तो आपल्या घरचा सदस्य आहे आणि त्याचा तसा आदर करायला हवा हा फार महत्त्वाचा संस्कार आहे.
जोई आणि माझी मैत्री इतकी घट्ट आहे की, न बोलतासुद्धा मला त्याच्या सगळ्या गोष्टी कळतात. नुसता समोर येऊन उभा राहिला की मला समजतं ह्याला पाणी हवं आहे, का भूक लागली आहे, का नुसती मस्ती करायची आहे. जोईसोबत राहून आम्ही खूप गोष्टी शिकलोय. काही कारण नसताना खुश राहणं ही त्याची खासियत! तो आमच्यासोबत चांगल्या आणि वाईट दिवसांमध्येसुद्धा बाजूला असतो. एका गोड मित्रासारखा.
ही अशी शब्दांमधे न अडकलेली मैत्री सगळ्यांनी अनुभवायला हवी.
Read More blogs on Parenting Here
Print + Audio
Only Audio
Only Magazines
Magazines
Our Combo Packs
Books By Quests
Curated
Books
Parenting Courses
Expert Talks
Books on Parenting
Parenting
Blogs