लेखक : सौ. गौरी तारे -कित्तूर
हॅलो छोट्या आणि मोठ्या दोस्तांनो!
माझं नाव गौरी. या ब्लॉगमधून मी तुम्हाला काही कमाल लोकांची ओळख करून देणार आहे अणि त्यांच्या मजेशीर गोष्टी, किस्से सांगणार आहे.
तर सगळ्यात पहिल्यांदा ऑफिसमध्ये मोठी मोठी कामं करणारा पण वेळ मिळाला की लहानांसारखा मस्ती करणारा “मोठा माणूस”. त्याला कॉपी करणारा, खोडकर “छोटा माणूस”. आपला हा छोटा माणूस आहे नं, त्याला सुपरहिरोचं जाम वेड आहे. आणि एक आहे “ठकूबाई”, वय वर्ष फक्त दिड. उंची पण तितकीच. पण तिचे कारनामे काही विचारू नका. या सगळ्या बंड मंडळीमध्ये एक साधू पण आहे हं, त्याचं नाव आहे “संत जोई”. तो आहे खरा कुत्रा पण वागणं अगदी संतासारखं. चला तर मग आज यांची एक गोष्ट वाचूयात.
रोजच्याप्रमाणे छोट्या माणसाला खाली प्ले-ग्राउंडला सोडलं आणि मी अन ठकूबाई निघालो फिरायला. ती तिच्या बाबागाडीमध्ये. कडेवर वगैरे हा सतत वळवळणारा प्राणी घेऊन फिरणं म्हणजे अशक्यच 😁 कधीकधी तर संत जोई पण असतात सोबतीला.
ग्राउंडवर लहान मुलांचे खेळ बघण्यात एक वेगळीच गंमत आहे. किती तो दंगा, काय ती मस्ती. जोडीला आरडाओरड असतेच. अगदी अंगात आल्यासारखे वागतात. छोटा माणूस आणि त्याच्या मित्रमैत्रिणींचे खेळ म्हणजे दर सेकंदाला मिनी हार्टअटॅक देणारे. “अरे इतक्या वर चढू नकोस, खाली उतर, बूट कशाला काढलेत? मोजे कुठे फेकले? कमी ओरड जरा, किती जोरात धावता?” असे माझे विचारही धावत असतात त्यांच्या सोबत.
मोठ्या माणसाचं म्हणणं आहे ‘अगं मुलं अशीच खेळतात, जास्ती लोड घेऊ नकोस. मी पण असाच खेळायचो.’ असेल बाबा.. आजकाल जरा लांबच थांबते मी.
काल फिरता फिरता जोईच्या fan club नी मला रस्त्यात धरलं. 5-6 मुलींचा ग्रुप. एक जण आली आणि म्हणाली, “Aunty you know me well right, Will you help us?”
मी म्हंटलं, “Yes, of course! But What happened?”
“Aunty, these girls are fighting and saying bad bad things to us. Can you talk to them?”
मग झाडावर चढलेल्या 2-4 मुलींकडे बोट दाखवून त्यांना माझ्यासमोर बोलावलं. आता ह्या निवाडयासाठी नेमकी माझी निवड का झाली असावी हा विचार करण्याच्या आत, दुसर्या पार्टीची गार्हाणी चालू झाली. 10-15 मिनिटं सगळं ऐकलं, मग म्हटलं बसून घ्या मुलींनो 😆 आता या वयातल्या मुलांना सरळ सांगून काहीच पटत नाही. मी सांगू शकले असते, “नका भांडू, खेळा शांतपणे.” But this advice is so mainstream and boring!
मी ठरवलं आपण उपदेशाचे फुकट डोस न देता, गम्मत करावी जरा.
मी त्यांना एक गोष्ट सांगायला सुरुवात केली. गोष्ट सांगणार इतकं म्हंटलं फक्त आणि लगेच चेहरे खुलले. गोष्ट आपली तीच हो नेहेमीची, दोन मांजरी चीझसाठी भांडत बसतात आणि माकड त्याचा फायदा घेऊन चीझ लंपास करतं. आता खरं तर गोष्टीचा आणि त्यांच्या भांडणाचा काहीच संबंध नाही. पण या गोष्टींची एक मजा आहे, आपल्याला हवी तशी ती वळवायची. मतितार्थ तोच पण कॅरेक्टर्स वेगळी. मी रंगवून गोष्ट सांगत होते. त्या गोष्टीच्या निमित्ताने सगळ्या मैत्रिणी एकत्र आल्या. या सगळ्यात भांडण पार विसरल्या, मग एकीने जोक सांगितला, फिदीफिदी हसल्या आणि हातात हात धरून चिमण्या चिवचिव करत परत खेळायला गेल्या.
अशीच आमची एक संजू, राजूची गोष्ट आहे. छोट्या माणसाला जी शिस्त लावायची आहे, त्यानुसार गोष्ट बदलते. 🤣 एखादा दिवस स्वतः काही चुकीचं वागला, की म्हणतो “ममा आज रात्री संजू, राजूची गोष्ट सांग.” 😆
रोज मुलांना गोष्टी सांगायचे खूप खूप फायदे आहेत. मी जे अनुभव घेतेय ते असे ~
1) It makes learning easy~ गोष्टीरुपात सगळं कसं छान लक्षात रहातं. सोप्पं.
2) Storytelling sharpens memory of kids~ एखादी गोष्ट परत सांगा आणि डिटेल्स जरा वेगळे सांगा बघू, लगेच मुलं पकडतात, “ए ममा राम नाई काही हनुमान म्हणाला हे वाक्य.”
3) Boosts Listening skills~ जसं पटापटा बोलता आलं पाहिजे तसं शांतपणे ऐकताही आलं पाहिजे. दुसर्याचं ऐकणं ही फार रेअर क्वॉलिटी आहे आणि महत्त्वाचीसुद्धा. हा एक चांगला संस्कार आहे असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. आजकाल बोलणारे ‘experts’ खूप असतात, पण मनापासून ऐकणारे किती आहेत?
4) Bonding time~ रोज रात्री झोपताना छोटा माणूस आणि मी आजीनी दिलेल्या गोधडीमध्ये गुरफटून नवीन गोष्टी वाचतो. तो वेळ फक्त गोष्टींचा, माझा आणि त्याचा. मग तेव्हा फोन-बिन जवळ नसतो अजिबात. सकाळी मोठा माणूस त्याला सुपरदादाच्या अफलातून काल्पनिक, स्वतः बनवलेल्या गोष्टी सांगतो. आता त्यात superhero कोण हे सांगायला नको 😜 त्यात गोष्टीचं तात्पर्य वैगेरे काही नाही, फक्त अन् फक्त भन्नाट adventures.
5) Stimulates imagination and creativity~ Screen वर एखादं cartoon बघणं आणि गोष्टी रंगवून डोळ्यासमोर आणून ती मजा घेणं यात खूप फरक आहे. गोष्टीमुळे कल्पनाशक्ती वाढते. आजकाल छोटा माणूस स्वतः गोष्टी बनवून ठकुबाईला सांगत असतो. संत जोई सुद्धा त्याचा फुकट audience. 😆
6) Understanding different cultures~ आम्ही एक जपानी पुस्तक मध्ये वाचत होतो. जपानी लोकांचं जेवण, नावं, वेगळया पद्धती, त्यांच्या बोधकथा, आपल्यापेक्षा किती वेगळ्या. मलासुद्धा ते पुस्तक जाम आवडलं.
एखाद्या वेळी गोष्ट सांगायचा कंटाळा आला तर चिकूपिकूच्या ऑडिओ गोष्टीही ऐकतो आम्ही. मस्त असतात..तुम्हीसुद्धा ऐका! ❤
You are never too old, too wacky, too wild, to pick up a book and read to the child- Dr. Seuss
सौ गौरी तारे कित्तूर
#withpinchofsugar
Read More blogs on Parenting Here