लेखक :  सौ. गौरी तारे -कित्तूर


मला आणि माझ्या नवऱ्याला म्हणजे ‘मोठ्या माणसा’ला बाहेर फिरायची, वेगवेगळी cuisine ट्राय करायची, ट्रेकिंगची खूप आवड. आपल्याला जेव्हा बाळ होईल तेव्हा आपण कसे पालक होऊ, चांगलं पॅरेंटिंग आपण करू शकू का, यापेक्षा आमच्या मनात पहिला विचार हा होता की बाळ आल्यावर आपलं विश्व जरी बदललं तरी आपलं मन ज्या गोष्टीत रमतं त्या गोष्टींनासुद्धा प्राधान्य असायला हवं. आपण ज्या गोष्टी एन्जॉय करतो त्या आपल्यासोबत आपल्या मुलांनीसुद्धा कराव्या.

ठरवल्याप्रमाणे प्रेग्नन्सीमध्येसुद्धा मी नियमितपणे ट्रेकिंगला जायचे. अर्थात काळजी वगैरे घेऊन.

मग आमचं बाळ म्हणजे ‘छोटा माणूस’ आयुष्यात आला आणि खरंच विश्व बदललं. पूर्ण वेळ मी अणि माझं बाळ एका खोलीत. Feeding, burping, napping, pooping असं अखंड चक्र दिवसरात्र चालू असायचं. दोन अडीच महिने आराम केला, चिडचिड केली, तब्येत बरी केली. मोठ्या माणसाला म्हटलं की बस आता. मला कुठेतरी ने बाबा. Mountains are calling and I must go वगैरे

छोट्याश्या अडीच महिन्याच्या शर्विलला घेऊन आम्ही सिऍटलजवळच्या एका पहाडावर गेलो. पहिलं मुल म्हणजे थोडी धाकधूक होतीच, हा नीट राहील ना? हा खूप रडणार तर नाही? नवीन ठिकाणी झोपेल ना? पण थोडं त्याने जुळवून घेतलं आणि थोडं आम्ही. आणि तेव्हापासून एक वेगळाच आत्मविश्वास आला.
Parenting, raising kids can be fun. We don’t have to be home bound once we have a baby. Parenting and fun can go hand in hand.

मग तो अगदी 6 महिन्याचा असताना लहान मोठ्या रोडट्रिप्स केल्या. सिऍटल सोडताना एकदा हवाईला जायची इच्छा होती. लांबचा विमानप्रवास, समुद्र, खूप वेळ कारमधला प्रवास, हे सगळं नऊ महिन्याच्या बाळाला घेऊन!! आम्ही हवाईला एका होम-स्टेमध्ये थांबलो होतो. तिथे एक आजोबा-आजी राहायचे. आजोबा रोज सकाळी मस्त गरमागरम ब्रेकफास्ट बनवून द्यायचे अणि मग हवाईची माहिती, त्यांच्या घरच्या गमतीजमती, आजोबांचे अनुभव अशा तासनतास गप्पा रंगायच्या. मी छोट्या माणसासाठी अगदी टिपिकल नवीन आईसारखं नाचणी खीर, मऊ खिचडी, पेज तूप याच्या तयारीतच असायचे. त्या घरात पपईचं झाड होतं. एकदा आजोबांनी छोट्या माणसाला पपईची फोड दिली. दात अगदी 2-4. मी म्हटलं नको त्याने कधी खाल्ली नाहिये. ते म्हणाले तू वेगवेगळे पदार्थ ट्राय करणार मग त्याने का नको? Keep your Indian food away for a few days and let him devour new things. How true! त्यानंतर पूर्ण 10 दिवस छोट्या माणसाने नाचणी खिरीकडे ढुंकून न बघता पपई, आंबा, अननस, नारळ पाणी यावर ताव मारला.

तो अडीच-तीन वर्षांचा असल्यापासून आम्ही त्याला लांबच्या ट्रिपला न्यायला लागलो. कोकण, गोवा, हंपी. मागच्या महिन्यात त्याने आणि मोठ्या माणसाने नाणे घाटात जिवधनचा ट्रेक केला. त्याच्या मानाने कठीणच होता. पण त्याने केला ट्रेक पूर्ण. आता तो ट्रेकला जायच म्हटलं की सकाळी 4 वाजता स्वतः अलार्म लाऊन आनंदाने उठतो. तिथे कुठल्याही कपात दूध पितो, ममानी पॅक केलेला डबा न कुरकुर करता खातो. हे सगळं पाहिलं की मस्त वाटतं..

थोडावेळ आपल्यातल्या पालकाला बाजूला ठेऊन एक व्यक्ति म्हणून आपल्याला काय आवडतं, ते शोधलं आणि ते जोपासलं तर पालकत्वाची मजा आपल्या मुलांसोबत आपण नक्कीच घेऊ शकतो.

काहीजण म्हणतात ना, क्या यार अभी तो बच्चे हो गये, अभी कुछ नही कर पाते. मला अजिबात हा दृष्टिकोन आवडत नाही. का नाही करू शकत? कधीकधी आपण ठरवायचा अवकाश असतो हो फक्त. एकवेळ कमी खेळणी, कमी ब्रॅण्डेड कपडे चालतील but childhood should be filled with enriching experience. जसं माझ्या वडिलांनी मला लहानपणी अर्धा भारत फिरवला, तोच फिरायचा किडा मुलांकडे पास-ऑन करायची इच्छा आहे. And like they say, once the travel bug bites you, there is no known antidote !

Be a happy person first then happy parenting, happy kids will follow automatically.

Read More blogs on Parenting Here