सध्या मुलं शाळा, क्लासेस मध्ये बिझी असली तरी सुट्टीच्या दिवशी म्हणा, किंवा सुट्टी नसली तरी रिकाम्या वेळेत काय करायचं असा प्रश्न पालकांना हमखास पडतो. आता तर दिवाळीच्या सुट्ट्या सुद्धा येऊ घातल्या आहे आहेत. दुपारी किंवा अभ्यास झाल्यावर लगेच त्यांना बाहेर खेळायला पाठवता येत नाही आणि मुलांनाही स्वस्थ बसवत नाही. अशावेळी TV बघू दे किंवा मोबाइल दे असा मुलांचा हट्ट चालू होतो. घरी खेळायचं म्हंटल तर जागा कमी, पर्याय कमी. अशावेळी नेमकं काय करायचं, आई-बाबांना सुचत नाही.
मुलांनी खेळायचं तरी कधी? अभ्यासाच्या वेळा जपून कसं मॅनेज करायचं? घरात खेळायचं तर नक्की काय खेळायचं? मुलांना screen पासून दूर ठेऊन त्याचा वेळ कसा मार्गी लावायचा हा प्रश्न सर्वच पालकांना सध्या सतावतो आहे. यात अजून एक महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो तो म्हणजे मुलांचं मनोरंजन आणि त्याचवेळी त्यांचा शारीरिक आणि मानसिक विकास कसा साधायचा? आई-बाबा ऑफिस मधून आल्यावर त्यांना मुलांसोबत खेळता येतील किंवा खेळताना संपूर्ण घरातले मेंबर्स एकत्र येतील असे काहीं खेळ (fun games to play with family) आहेत का? आजच्या ब्लॉगमध्ये आपण असे काही खेळ पाहूयात, जे घरात राहून संपूर्ण कुटुंब एकत्र येऊन खेळू शकतात आणि हे खेळ इतके साधे, सोपे आणि रंजक आहेत की, आई-बाबा कितीही थकले असले तरी त्यांना नक्की यात सहभागी व्हावंसं वाटेल! ह्यातले बरेच खेळ चिकूपिकूच्या website वर सुद्धा उपलब्ध आहेत.
चला तर मग, बघू या असे काही गम्मत सोपे खेळ (fun games to play with family) जे तुमचं घर नक्की हसवून टाकतील, आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद आणतील!
वैज्ञानिक गंमत खेळणी: सेट १ (Scientific Fun Toys: Set 1) (वयोगट: २ ते ६)
लहान मुलं ज्यांना स्वतःहून काहीतरी तयार करायला आवडतं, त्यांच्यासाठी हे खेळ एकदम योग्य आहेत. खेळणं तयार करण्याची आणि खेळताना धमाल करण्याची संधी मुलांना मिळते. कागद, जुने साहित्य आणि रोजच्या वस्तूंचा वापर करून मुलं त्यांच्या हातांनी खेळणी तयार करतात, त्याचबरोबर ते वैज्ञानिक संकल्पना शिकतात आणि त्यांच्या कुतूहलाला चालना मिळते.
टाईल्सचे शिल्पचित्र बनवू या (Tile Art)
घरात उपलब्ध टाईल्स किंवा कागदांचा वापर करून मुलं आणि पालक मिळून सर्जनशील चित्रे तयार करू शकतात. हे चित्रे घराच्या भिंतीवर किंवा फ्रेममध्ये ठेवून सजवता येतात. यामध्ये सगळ्यांना एकत्र येऊन विचार करावा लागतो, आणि प्रत्येकाचे वेगळे विचार या चित्रांमध्ये समाविष्ट होतात.
पत्ते (Playing Cards)
पत्ते खेळणे हा खेळ एकदम सोपा आणि सगळ्या वयाच्या लोकांना गुंतवून ठेवणारा आहे. एकत्रित बसून वेळ घालवण्यासाठी (Playing with family) हा एक उत्तम मार्ग आहे.
Learn how play strengthens parent-child bonds in our blog!
वैज्ञानिक गंमत खेळणी : सेट २ (Scientific Fun Toys : Set 2) (वयोगट: साधारण ६ आणि ६+)
थोडी मुलं आणि मोठ्यांनी एकत्र खेळता येतील असे खेळ (fun games to play with family) या सेटमध्ये आहेत. हे खेळ मुलांच्या बुद्धीला चालना देतात, त्यांना विचार करायला लावतात, आणि सर्जनशील बनवतात. या खेळांमध्ये काही वैज्ञानिक संकल्पनांवर आधारित खेळ आहेत, जसे की गुरुत्वमध्य, सोलर सिस्टीम आणि centrifugal force. हे खेळ मुलांच्या विचारक्षमतांचा विकास करतात आणि एकत्र खेळताना कुटुंबातील सदस्यही खूप मजा करू शकतात.
Check Out Chikupiku's Scientific Fun Toys Set2 Here..
बुद्धिबळ किंवा लूडो (Chess or Ludo)
बुद्धिबळ आणि लूडो हे बुद्धीचातुर्य आणि थोडा संयम लागणारे खेळ आहेत. मुलांच्या विचारसरणीला चालना देण्यासारखे खेळ असून, पालकांनाही यात रस येतो. दमलेल्या आई-बाबांसाठीही हे खेळ उत्तम पर्याय आहेत कारण ते त्यात जास्त शारीरिक मेहनत न करता सुद्धा सहभागी होऊ शकतात.
अक्कणमाती चिक्कणमाती (Clay Play)
घरात असलेल्या चिकणमातीचा किंवा घरातल्या शदांच्या कुंडीमधली माती याचा वापर करून विविध वस्तू बनवण्याचा आनंद घेतला जाऊ शकतो. मुलं आणि पालक मिळून कलेची मजा घेऊ शकतात, आणि त्यांच्या सर्जनशीलतेला वाव मिळतो. सगळ्यात छान कलाकृती कोण करू करतो अशी एक स्पर्धा सुद्धा करत येऊ शकते.
पगड्या (Musical Chairs)
पगड्या हा खेळ थोडा आवाज आणि धावपळ करणारा असला तरी खूप मजेदार असतो. यात गाण्यांच्या तालावर चालत असताना खुर्च्या पकडायच्या, जेव्हा गाणं थांबतं तेव्हा फक्त एक खुर्ची मिळेल! मुलांसोबत आई-बाबांनीही यात भाग घेतल्यास (Playing with family) खेळाचा आनंद दुप्पट होतो.
कागदी विमान आणि कागदाच्या घड्यांपासून बनवलेल्या वस्तू (Paper Planes) (Origami)
मुलं आणि मोठ्यांनी एकत्र बसून कागदी विमान बनवणे, , हा अगदी साधा सोप्पं आणि हमखास मनोरंजन करणारा खेळ आहे. सगळ्यांनी आपापली विमानं तयार करावी आणि कोणाचे विमान सर्वात लांब जातं याची स्पर्धा ठेवावी! फक्त विमानाचं नाही घरातले मोठे सदस्य ओरिगामीच्या (कागदापासून तयार होणाऱ्या) इतर वस्तू पण मुलांना करून दाखवू शकतात.
पत्त्यांचा बंगला (Card Tower Building)
पत्त्यांचा बंगला बनवणे हा एक संयमाचा खेळ आहे. त्यात कोणीतरी पत्त्यांचा मोठा बंगला बांधायचा प्रयत्न करत असतो, तर बाकी सगळे तो पडू नये म्हणून प्रयत्न करत असतात! हा खेळ मुलांना संयम शिकवतो आणि कौटुंबिक टीमवर्कची भावना वाढवतो.
चिकूपिकू बोर्डगेम्स (Chiku Piku Board Games)
चिकूपिकूचे बोर्डगेम्स खेळून कुटुंबातील प्रत्येकाला गमतीदार वेळ घालवता येतो. या खेळांमध्ये शिक्षण आणि मजा एकत्र येते, ज्यामुळे मुलांना आणि पालकांना दोघांना ते आवडतात. हे खेळ मुलांमध्ये स्पर्धात्मकता आणि सहकार्य वाढवतात, ज्यामुळे कुटुंबियांमधील बंध आणखी दृढ व्हायला मदत होते.
कुटुंबासोबत खेळणे (Playing with family) हा केवळ खेळ नसतो, तर तो एकत्रित वेळ घालवण्याचा आनंददायी अनुभव असतो. खेळ खेळताना हसणे, मजा करणे, आणि एकमेकांशी संवाद साधणे ह्या गोष्टी मुलांच्या संगोपनासाठी खूप महत्वाच्या आहेत.
Check out our blog on 'खेळ खेळू आनंदे' to explore the importance of play!
आजकाल आपण मुलांसोबत quality टाइम दिला पाहिजे असं म्हणतो, मुलांसोबत वेळ घालवण्यासाठो दर वेळी कुठेतरी पिकनिकला किंवा मॉलमध्ये जायची गरज नाही आणि किंवा त्यांना खुश करण्यासाठी महागडे गेम्स किंवा खेळणी आणून द्यायची गरज नाही त्यांना फक्त तुमचा सहवास हवा असतो आणि म्हणूणच हे खेळ घरात खेळून बघा आणि मुलांना आणि मोठ्यांना सुद्धा खेळण्याची मजा द्यायला विसरू नका.