लेखक : डॉ. विभुषा जांभेकर
लहान मुलांच्या आहाराचा जसा वयानुसार किंवा तब्येतीनुसार आपण विचार करतो तसाच हवामानानुसारसुद्धा करायला हवा, यालाच आयुर्वेदात ऋतुचर्या म्हणतात. हिवाळ्यात वातावरण थंड असते आणि भूक वाढते. हिवाळ्यात घेतलेला आहार हा मुलांच्या पुढील संपूर्ण वर्षभराच्या आरोग्याचे foundation आहे. कारण हिवाळ्यात आपले metabolism अतिशय उत्तम असते. शारीरिक शक्ती वाढवायला आणि इम्युनिटी सुधारण्यासाठी त्याचा उपयोग होतो. त्यासाठी काही पदार्थ आवर्जून मुलांच्या आणि आपल्याही आहारात समाविष्ट करायला हवेत. असे अन्नपदार्थ कोणते आहेत ते पाहू या.
१ आवळा :
आवळा हा व्हिटॅमिन C चा उत्तम स्रोत आहे. मुलांबरोबर घरी मिठाच्या पाण्यात घातलेल्या आवळ्याच्या फोडी, आवळा सुपारी, आवळ्याचं लोणचं हे पदार्थ जरूर करा.
२ रताळं :
वाढत्या वयातल्या मुलांना लागणारे बीटा कॅरोटीन (ज्या पासून व्हिटॅमिन ए तयार होते) आणि फॉलीक ऍसिड हे रताळ्यातून मिळते. रताळ्याचा किस, रताळ्याचे काप, रताळं घालून कटलेट्स थंडीत जरूर करावी.
३ बाजरी :
पूर्वीच्या काळी जनावरांसाठी बाजरीचं पीक घेतलं जात असे. पण बाजरीचे आरोग्यवर्धक गुणधर्म लक्षात आल्यानंतर तिचा आहारात समावेश होऊ लागला. बाजरी कॅल्शियम, फॉस्फरस आणि लोहाचा उत्तम स्रोत आहे. कॅल्शियम आणि फॉस्फरसने हाडं मजबूत होतात. कमी जेवणाऱ्या किंवा अशक्त असणाऱ्या लहान मुलांच्या आहारात बाजरी आवर्जून समाविष्ट करावी.
४ कडधान्य :
मूग, मटकी, मसूर आणि इतर कडधान्य मुलांना नियमित द्यावी. कडधान्य खाण्याचा नियम एकच तो म्हणजे ती मोड आणून खावी. मोड येण्याच्या प्रक्रियेत ती पचायला हलकी होतात, पोषण मूल्य वाढते आणि त्यात असलेले काही nutrient inhibitors & inactivate होऊन त्यात ‘क’ जीवनसत्वाची निर्मिती होते. कडधान्याची उसळ, कढण, भेळ मुलांसाठी जरूर करावी.
५ दूध :
लहान मुलांना दररोज गायीचे दूध आवर्जून द्यावे. मेंदूच्या वाढीसाठी, रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी, दूध गरजेचं आहे. पण आजकाल बहुतांश मुलं साखर घातल्याशिवाय दूध प्यायला तयारच होत नाहीत. साखर अत्यंत अपायकारक आहे त्यामुळे साखर घालून दूध देणे टाळावे. पनीर, ताक, दही या स्वरूपातही दूध देता येईल. दुधाचे गोड पदार्थ म्हणजे खीर, ड्रायफ्रूट मिल्कशेक इत्यादी करताना खारीक पूड किंवा खजूर घालून करावे.
६ खजूर :
थंडीत मुलांना दररोज खजूर खायला द्यावे. खजुरात लोह, मॅग्नेशियम, पोटॅशियम हे सर्वाधिक प्रमाणात असतात. याशिवाय राइबोफ्लेविन, नायसिन, फॉलिक एसिड, व्हिटॅमिन बी6 देखील असते. थंडीत भूक वाढते आणि अशावेळी खजूर खाल्ल्याने त्यातून त्वरित ऊर्जा मिळते. खजूर आणि ड्रायफ्रूटचे लाडू मुलांना द्यावे. गाजर हलव्यासारखे पदार्थ करताना थोडा गूळ आणि थोडा खजूर वापरून करावे.
हिवाळ्यात या सगळ्या घटकांचा वापर योग्य प्रमाणात मुलांच्याच नाही तर घरातल्या सगळ्यांच्या आहारात केला तर परिपूर्ण आहार घेतला जाईल आणि इम्म्युनिटी वाढायला देखील मदत होईल.
– डॉ. विभूषा जांभेकर
Read More blogs on Parenting Here
Print + Audio
Only Audio
Only Magazines
Magazines
Our Combo Packs
Books By Quests
Curated
Books
Parenting Courses
Expert Talks
Books on Parenting
Parenting
Blogs