लेखक : अनुजा कुलकर्णी , श्रावणी उभे
मुलांना वळण कसं लावायचं ? | How to develop good habits in a child?- Parenting Tips
अनेकदा पालक म्हणून आपल्याला प्रश्न पडतो मी मुलांना वळण कसं लावू ? मुलांना आई- बाबा आपल्याला हि सूचना का देतात हे लक्षात येत नाही. म्हणूं पालक म्हणूं आपण कोणता विचार करून वेगवेगळ्या गोष्टींच वळण मुलांना कसं लावू शकतो ते बघुयात….
खाण्या-पिण्याचं वळण - Good Eating Habits for Kids
१. मुलांना पदार्थांचे खूप ऑपशन्स ठेऊ नका.
२. जर घरात ऑपशन्स असतील तर हि भाजी पहिले संपण मगच तुला मी एक गोड पदार्थ देईन असं आपण करू शकतो.
३. एकदा मुलाचं वय ५ वर्षाचे झाले कि मुलं स्वतः खाणं मागून शकते, त्यावर विश्वास ठेवा.
४. जेवणाच्या वेळी स्क्रीन टाईम नको. त्या ऐवजी ऑडिओ स्टोरीज, गोष्ट वाचणे असे पर्याय आपण देऊ शकतो.
५. जंक फूड (वेफर्स, चॉकलेट, जॅमया आणि इतर)पदार्थ मुलांना देण्यापेक्षा आपण त्याचाच एक वार ठरवून घेऊ शकतो. त्याच दिवशी आपण त्यांना ते पदार्थ ठराविक प्रमाणात खायला देऊ शकतो.
६. जंक फूड मध्ये आपण जे पदार्थ घरी करू शकतो ते आपण घरी मुलं बरोबर करूयात. उदा. पास्ता, पिझ्झा, पाव- भाजी.
७. हे नियम आपण घरातल्या इतर माणसांना सांगून, त्याचा विचार घेऊन ठरवून घरातल्या सगळ्यांनी ते नियम पाळणं गरजेच आहे. तेव्हाच मुलांना देखील आपण खाण्याचं चांगलं वळण लावू शकतो.
झोपण्याच वळण - Sleeping Habits for Kids
१. मुलांना ८ ते १० तासांची झोप आवश्यक आहे. साधारण वयाच्या ५ वर्ष नंतर मुलांची दुपारची झोप कमी होते.
२. झोपेच्या वळणाची पालकांनी मुलांच्या झोपेच्या आणि खाण्याच्या रुटीन नुसार त्याच रुटीन ठरवून घ्यावं.
३. जर मुलं संध्याकाळच्या वेळात दमली असतील तर ती लवकर झोपतील आणि दुसऱ्या दिवशी लवकर उठतील. त्यासाठी त्यांना ग्राउंड किंवा खेळ खेळण्यासाठी पाठवाव.
४. झोपताना स्क्रीनटाईम टाळावा. त्यापेक्षा मुलांना आपण पुस्तक वाचून दाखवू शकतो.
५. आई किंवा बाबा नि कोणीही मुलांना त्याच्या ठरलेल्या झोपण्याच्या जागी त्याची वेळ झाली कि घेऊन जावे, लाईट बंद करून त्याना झोपवावे. ह्या सगळ्यामुळे मुलांची झोप छान होऊ शकते आणि मुलांना झोपेचं वळण लावू शकतो.
Also Read- आपण पालक म्हणून कसे आहोत?
अभ्यासाचे वळण – How to Make kids Study
१. अभ्यास घेताना मुलांना आपण समजून सांगत अभ्यास घेऊ शकतो. उदा. ह्या पानावरच अक्षर खूप छान आहे रे. तू आता उरलेले ५ ओळी अश्या अक्षरात लिहून बघतोस का?
२. अभ्यास करताना त्यांना सूचना किंवा negative बोलण्यापेक्षा आपण त्याना विचारू शकतो आणि तू काय करू शकतोस हे सांगू शकतो.
३. अभ्यास करताना मुलांना आपण आंनदाई अनुभव देऊयात. चीड-चीड करत त्याचा अभ्यास आपण नको घेऊयात.
हे नक्की लक्षात ठेऊ या –
१. माझ्या मुलाची शिस्त आणि वळण हि माझी एकट्याची किंवा एकटीची जवाबदारी आहे. त्याचे गैरवर्तन म्हणजे माझ्या पालकत्वातील त्रुटी -हेच आहे.
२. मुलांचे वळण म्हणजे माझी पालक म्हणून सोय.
३. ओरडणं किंवा मारणं याचे दीर्घकालीन परिणाम होतात ते टाळूयात.
४. माझे मानसिक स्वास्थ्य , मला संयम, नवीन युक्त्या सापडण्याची mental space आणि willingness देते.
Read More blogs on Parenting Here