तोत्तोचान चक्क एका रेल्वेच्या जुन्या डब्यात भरणाऱ्या शाळेत जायला लागली होती! तिथले विषय, शिकण्याची पद्धत, तिथल्या सहली, तिचे मित्रमैत्रिणी आणि तिचे अफलातून शिक्षक हे सगळेच जगावेगळे होते. गोष्ट ऐकत, गाणी गात, नाचत आपण या तोमोई शाळेची सफर करू या का? तोत्तोचान या प्रसिद्ध पुस्तकातल्या छोट्या तोत्तोचानला भेटायला, तिच्या या वेगळ्याच शाळेबद्दल ऐकायला, बघायला नक्की या! सगळ्या छोट्यांसाठी, मोठ्यांसाठी आणि शाळेत गेलेल्या प्रत्येकासाठी हा खूप सुंदर अनुभव असणार आहे. वाट बघतोय…
Book Now"माझ्या मुलांना अस्खलित इंग्रजी बोलता यायला हवं. कॉलेजमध्ये, पुढे नोकरी करताना इंग्रजी लागणारच!" असं आपल्याला वाटतं. पण मूल कुठल्या भाषेत गप्पा मारतं? त्याला स्वप्नं कुठल्या भाषेत पडतात? ती भाषा म्हणजे त्याची पहिली भाषा; त्याची मातृभाषा. म्हणूनच चिकूपिकू मुलांशी मराठीतून बोलतो.